मुंबई : बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल यांच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र, दोघांनीही त्यांच्या लग्नांच्या बातम्यांवरती अद्याप कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. परंतु केएल राहूल आणि अथिया शेट्टी दोघे ही एकमेकांना डेट करत आहेत. हे मात्र नक्की कारण दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं आहे. अथिया शेट्टीचा भाऊ अहान शेट्टी याला जेव्हा त्याच्या बहिणीच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याने, केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची सध्या कोणतीही तयारी सुरू नसल्याचे सांगून या चर्चांना पूर्णविराम दिला.


केएल राहुल आणि अथियाचे लग्न कधी होणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अथिया शेट्टी आणि केएल राहुल गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही अनेकदा आपल्या सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. दोघेही अहान शेट्टीच्या डेब्यू चित्रपट 'तडप'च्या स्क्रिनिंगमध्ये एकत्र पोज देताना दिसले होते. दोघांचे बाँड त्यांच्या चाहत्यांनाही आवडते. दोघांच्या लग्नाची बातमी समोर येताच त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.


एका न्यूज पोर्टलशी बोलताना, अथिया आणि केएल राहुलच्या लग्नावर अहान शेट्टी म्हणाला की, 'आम्ही दरवर्षी आमच्या नानूच्या घरी ईद साजरी करतो. आम्ही त्याला प्रेमाने अब्बू म्हणतो. तिथे आम्ही एकत्र जेवण केले. सध्या लग्नाबाबत कोणतीही तयारी केली जात नाही. असा कोणताही समारंभ नाही. या सर्व अफवा आहेत. जेव्हा लग्नच ठरलेलं नाही तर आम्ही तारीख कुठून सांगू?


पुढे अहान शेट्टी म्हणाला की, 'त्यांची एंगेजमेंटही झाली नाही. आत्तापर्यंत, त्याबद्दल कोणतीही योजना नाही.'


आम्ही तुम्हाला सांगतो की अथिया आणि केएल राहुल अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला दोघे मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते. अथिया केएल राहुलला विमानतळावर घेण्यासाठी आली होती. अथियाचे वडील सुनील शेट्टी यांनाही या दोघांच्या नात्याबद्दल कोणतीही अडचण नाही.