केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर जेपी ड्युमिनीच्या पत्नीवर काही हल्लेखोराने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ड्युमिनीची पत्नी सुयू आणि त्याच्या आजीवर हल्ला झाला आहे. ड्युमिनीने आपल्या चाहत्यांना ट्विट करुन ही माहिती दिली आहे.


गुरुवारी दुपारी त्याची पत्नी केप टाऊनच्या एका क्लिनिकमध्ये आजी सोबत गेली होती. ते औषध घेत असतांनाच एका हल्लेखोराने त्यांच्यावर हल्ला केला आणि गळ्यातला नेकलेस ओढून नेला. या हल्लात त्यांची आजी देखील जखमी झाली आहे. ड्युमिनीने या पोस्टद्वारे तेथे राहणाऱ्या लोकांना सतर्क केले आहे, जे त्या क्लिनिकमध्ये औषधे घेण्यासाठी जातात.