Ben stokes : आगामी T20 World Cup पूर्वी आता सर्वच संघ तयारी करताना दिसत आहे. वर्ल्ड कपच्या तयारीसाठी अनेक देशांनी द्विपक्षीय मालिका आयोजित केल्या होत्या. अशातच आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये टी-ट्वेंटी मालिका (Australia vs England) खेळवली जात आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधील (Aus vs Eng 3rd T20I 2022) अखेरच्या सामन्यातील इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर बेन स्टोक्सचा (Ben stokes) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये हाय कॉलिटी सामने खेळले गेले. मात्र, कॅनबेरा येथे खेळला गेलेला अखेरचा सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. मात्र, या सामन्यात एक रोमांचक घटना घडली. बेन स्टोक्सला (Ben stokes) शायनिंग मारणं भरतंच महागात पडलंय. त्यामुळे सध्या तो क्रिडाविश्वात चर्चेचा विषय बनलाय.


आणखी वाचा - बेन स्टोक्सची 'सुपरमॅन' फिल्डिंग, हवेत उडी मारत अडवला SIX!


तर झालं असं की, पावसामुळे सामना 12 ओव्हरचा करण्यात आला होता. इंग्लंडच्या संघाची बॅटिंग सुरू होती. अखेरची ओव्हर टाकण्यासाठी ग्लेन मॅक्सवेलकडे (Glenn Maxwell) चेंडू सोपवण्यात आला. अखेरच्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर बेन स्टोक्सने (Ben stokes) चेंडू गगनात टोलवला. बॉल बॉड्रीच्या बाहेर न जाता खेळाडूच्या हातात जाईल, असं स्टोक्सला वाटलं. त्यामुळे तो पवेलियनच्या दिशेने निघाला. मात्र, फिल्डरच्या हातात बॉल बसला नसल्याचं पाहून स्टोक्सने धाव घेतली.


पाहा व्हिडीओ- 



दरम्यान, फिल्डरने बॉल अडवला आणि नॉन स्टाईकच्या दिशेने थ्रो केला. बाद होण्याच्या भीतीने स्टोक्स एकदम वेगानं धावला. त्याचवेळी तो दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात खाली आपटला. मात्र, त्याचवेळी त्याने शॉट रन (Ben stokes Shot Run) घेतली. हे लक्षात आल्यावर पडलेल्या स्टोक्सने पुन्हा उठून धाव पुर्ण केली. स्टोक्सची घाई पाहून अनेकांना हसू येतंय. स्वत: स्टोक्सला (Ben stokes Video) देखील व्हिडीओ पाहिल्यावर हसू आलं.