पेशावर : 3 मार्च 2009 हा दिवस पाकिस्तान क्रिकेटसाठी 'काळा दिवस' ठरला होता. याच दिवशी लाहोरमध्ये श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, ज्याचा त्रास पाकिस्तान अजूनही भोगत आहे. याआधी न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या संघांनी पाकिस्तान दौरा रद्द केला होता. आता 24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे. पण त्यावर ही दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. जो तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि एक टी-20 मालिका खेळणार आहे. पहिला सामना रावळपिंडीत 4 मार्चपासून खेळवला जात आहे. पण आज पाकिस्तानात एक भीषण स्फोट झालाय. ज्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाची चिंता देखील वाढली आहे.


द सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलिया स्फोटानंतर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. ऑस्ट्रेलियन संघ पेशावरमध्ये नसला तरी बोर्डाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.


स्फोटात 58 ठार


रावळपिंडीपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या पेशावरमधील मशिदीवर आत्मघाती (दहशतवादी) हल्ला झाला, ज्यामध्ये 58 लोक मारले गेल्याची माहिती आहे. तर 200 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत आता सुरक्षेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलियन संघही दौरा अर्ध्यावर सोडून परत येऊ शकतो, अशी भीती क्रिकेट चाहत्यांना आहे.


या स्फोटानंतर ऑस्ट्रेलियामधील क्रिकेट चाहते ऑस्ट्रेलियाने दौरा सोडून परत येण्याचं आवाहन केलं आहे. अनेक य़ुजर्स सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत.