डॉन ब्रॅडमन यांचा रेकॉर्ड मोडणारा स्मिथ होणार निवृत्त? त्याने स्पष्टच सांगितलं!
गेल्या काही दिवसांपूर्वी कसोटीमध्ये निवृत्ती घेण्याचे संकेद दिले होते. अशातच पुन्हा एकदा निवृत्तीच्या चर्चांवर स्मिथने खुलासा केला आहे.
Steve Smith on retirement : ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शतक करत ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला होता. शतक करत स्मिथ पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कसोटीमध्ये निवृत्ती घेण्याचे संकेद दिले होते. अशातच पुन्हा एकदा निवृत्तीच्या चर्चांवर स्मिथने खुलासा केला आहे. (aus vs sa steve smith refutes retirement talk after hitting 30th century latest marathi news)
मी ऑस्ट्रेलियाकडून अजून किती सामने खेळेल याबाबत आताच काही सांगू शकत नाही. येणाऱ्या मालिकांमध्ये मी खेळणार असून चांगल्यात चांगलं प्रदर्शन करण्याचा माझा प्रयत्न असल्याचं स्टीव्ह स्मिथने सांगितलं. स्मिथच्या या वक्तव्यावरून तो पुढे खेळणार असल्याचं दिसत आहे.
निवृत्तीबाबत स्मिथचं जुनं वक्तव-
अद्याप निवृत्तीबाबत कोणताही निर्णय घेण्याचा कोणताही विचार केला नाही. मी आता 33 वर्षांचा असून गेल्या 13 वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. 13 वर्षे हा खूप मोठा कालावधी असून मी आता खेळाचा आनंद घेतोय. शेवट जवळ आलाय हे निश्चित आहे, असं स्मिथ म्हणाला होता.
स्टीव्ह स्मिथने 91 कसोटी सामन्यांमध्ये 60.6 च्या सरासरीने 8543 धावा केल्या आहेत. स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथने आफ्रिकेविरूद्ध कारकीर्दितील 30 वं शतक पूर्ण केलं होतं. ऑस्ट्रेलियाकडून कसोटीमध्ये माजी कर्णधार रिकी पाँटिंगने सर्वाधिक 41 शतके केली आहेत.
दरम्यान, रिकी पाँटिंगनंतर दुसऱ्या स्थानावर स्टीव्ह वॉ यांनी 32 शतके केली आहेत. तिसऱ्या स्थानी 30 शतकांसह मॅथ्यू हेडन आणि स्टीव्ह स्मिथ आहेत. सर्वाधिक शतकांच्या यादीमध्ये स्मिथ जगातील 15 वा खेळाडू ठरला आहे.