West Indies historic victory at gabba : नव्या दमाच्या वेस्ट इंडिजने चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजला 27 वर्षे लागली. गाबाच्या मैदानात वेस्ट इंडिजने चौथ्या दिवशी रोमहर्षक सामन्यात 8 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. शमर जोसेफच्या घातक गोलंदाजीने वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला 207 धावांवरच रोखलं.  वेस्ट इंडिजच्या या ऐतिहासिक विजयानंतर माजी स्टार खेळाडू ब्रायन लारा (Brian Lara Emotional) याला अश्रू अनावर झाले. समालोचन करत असलेल्या ब्रायन लारा विजयानंतर भावूक झाल्याचं दिसून आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले Brian Lara?


माझा विश्वास बसत नाही. तब्बल 27 वर्षानंतर वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात हरवलंय. युवा आणि कमी अनुभव असलेल्या या संघाने आज तगड्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय. वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्यांसाठी हा ऐतिहासिक दिवस म्हणावा लागेल. आजच्या कामगिरीबद्दल प्रत्येक खेळाडूचं कौतूक करावं लागेल, असं ब्रायन लारा याने म्हटलं आहे.


वेस्ट इंडिजचा युवा गोलंदाज शमर जोसेफ याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या डावात 11.5 ओव्हरमध्ये 68 धावांच्या मोबदल्यात 7 विकेट्स घेतल्या. विंडिजने या विजयासह 2 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली आहे. वनडे वर्ल्ड कपसाठी निवड न झालेल्या वेस्ट इंडिजने वर्ल्ड कप चॅम्पियन आणि टेस्ट चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरात घुसून हरवल्याने सध्या संघाचं कौतूक होताना दिसतंय.



वेस्ट इंडिजचा संघ : क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंद्रपॉल, किर्क मॅकेन्झी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जस्टिन ग्रीव्हस, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), केविन सिंक्लेअर, अल्झारी जोसेफ, केमार रोच आणि शामर जोसेफ.


ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि जोश हेझलवूड.