Kevin Sinclair celebration Video : जगप्रसिद्ध अशा ब्रिसबेन म्हणजेच गाभाच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात  (Australia vs WestIndies) दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत वेस्ट इंडिजने चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर पाठवल्याचं पहायला मिळतंय. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 311 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाचे फलंदाज गारद झाल्याचं दिसून आले. वेस्ट इंडिजच्या भेदक माऱ्यासमोर कांगारूंचा टिकाव लागला नाही अन् ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात फक्त 289 धावा करू शकला. अशातच आता वेस्ट इंडिजच्या केविन सिंक्लेयर (Kevin Sinclair) याचं सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजला झटपट बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी सामना सोपा जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, गाभाच्या मैदानावर वेस्ट इंडिजच्या फास्टरने घिरट्या घातल्या अन् कांगारूंना निशाणा बनवलं. केमार रोच आणि अल्ज़ारी जोसेफ यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रमुख 5 फलंदाज बाद केले. 54 वर 5 विकेट्स अशी परिस्थिती कांगारूंची झाली होती. मात्र, उस्मान ख्वाजाने एक बाजू सांभाळली अन् अॅलेक्स कॅरीने मजबूत साथ दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची गाभावर लाज राखली गेली. वेस्ट इंडिजला कोणत्याही परिस्थितीत ख्वाजाची विकेट हवी होती. त्यामुळे क्रॅग ब्रॅथवेटने प्लॅन बी आमलात आणला.


क्रॅग ब्रॅथवेटने आपल्या नव्या फिरकी गोलंदाजाकडे म्हणजेच केविन सिंक्लेयरकडे बॉल सोपवला अन् एक स्लिप लावली. ख्वाजाला चूक करण्यास भाग पाडलं अन् उस्मान ख्वाजा वेस्ट इंडिजच्या जाळ्यात अडकला. कवर ड्राईव्ह खेळण्याच्या नादात ख्वाजा बाद झाला. ख्वाजाची विकेट केविन सिंक्लेयरच्या करियरमधील पहिली विकेट ठरली. त्यानंतर त्याने जल्लोषात सेलिब्रेशन केलं.


पाहा Video



ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेवन): उस्मान ख्वाजा, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरून ग्रीन, ट्रॅविस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, पॅट कमिंस, नाथन लायन आणि जोश हेजलवुड.


वेस्टइंडीज (प्लेइंग इलेवन): क्रॅग ब्रॅथवेट, तेजनारायण चंद्रपॉल, किर्क मॅकेंजी, एलिक एथानाजे, केवम हॉज, जस्टिन ग्रीव्स, जोशुआ दा सिल्वा, केविन सिंक्लेयर, अल्ज़ारी जोसेफ, केमर रोच आणि शमर जोसेफ.