मुंबई: एकीकडे आयपीएल खेळण्यावर ऑस्ट्रेलियन क्रेकट बोर्ड आणि खेळाडूंमध्ये वाद सुरू असताना आता मोठी बातमी येत आहे. टी 20 वर्ल्ड कपआधी 7 दिग्गज खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डला जोर का झटका बसला आहे. टी 20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर वेस्टइंडिज आणि बांग्लादेश दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या दौऱ्यात टीममध्ये सहभागी न होण्याचा निर्णय 7 दिग्गज खेळाडूंनी घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया टीममधील 7 खेळाडूंनी वेस्टइंडिज आणि बांग्लादेश दौऱ्यावर जाण्याआधी आपलं नाव संघातून मागे घेतलं आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डला मोठा धक्का बसला आहे.


ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डनं याबाबत माहिती दिली आहे. पॅट कमिन्स, ग्लॅन मॅक्सवेल, डेव्हिड वॉर्नर, स्टीव स्मिथ, स्टोइनिस, जॉय रिचर्डसन आणि केन रिचर्डसन या खेळाडूंनी माघार घेतली आहे. गेल्या एक वर्षात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सतत्याने क्वारंटाइन आणि बायो बबलमध्ये राहात आहेत.


या दोन दौऱ्यात पुन्हा एकदा बायो बबलमध्ये राहावं लागणार असल्यानं या खेळाडूंनी माघार घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टिव स्मिथ जखमी आहे. त्यामुळे सध्या तो मैदानापासून दूर राहणार आहे.


टी 20 वर्ल्ड कप आधी सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये आयपीएलचे उर्वरित 31 सामने होणार आहेत. या सामन्यांमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सहभागी होऊ नये असं सांगण्यात आलं आहे.


दुसरीकडे परदेशी खेळाडू आयपीएलच्या उर्वरित सामन्यात सहभागी झाले नाहीत तर त्यांचा पगार कापला जाणार असल्याचा इशारा बीसीसीआयने दिला आहे. त्याने कात्रीत सापडलेले हे खेळाडू नेमकी काय भूमिका घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.