AUS vs IND : अखेरच्या सामन्यात कांगारूंनी लाज राखली; टीम इंडियाचा 2-1 ने मालिका विजय!
Team india win ODI series aginst Australia : टीम इंडियाला अखेरच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाने मालिकेत राज राखली आहे. टीम इंडियाने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.
Australia vs India 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात (Australia Beat India in 3rd ODI) कांगारूंनी टीम इंडियाचा 66 धावांनी पराभव केला आहे. त्यामुळे आता शेवटचा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपआधी लाज राखली आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने 2-1 ने मालिका खिशात घातली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 352 धावांचा डोंगर उभा केला होता. त्याला प्रत्युत्तर देतना टीम इंडियाला फक्त 286 धावा करता आल्या. टीम इंडिया 50 ओव्हरच्या आतच ऑलआऊट झाली. त्यामुळे आता वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
ऑस्ट्रेलियाने दिलेलं आव्हान पार करताना टीम इंडियाची सुरूवात चांगली झाली. रोहित शर्माने वॉशिंग्टन सुंदर याच्यासोबत पहिल्या 10 ओव्हर चोपून काढल्या. त्यानंतर विराट कोहलीसोबत चांगली पार्टनरशीप केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनचं टेन्शन वाढलं होतं. कमिन्सने गोलंदाजीत सुधारणा केली अन् मॅक्सवेलच्या हातात बॉल सोपवला. त्यानंतर मॅक्सीने भारताच्या तीन मोठ्या विकेट्स काढल्या. त्यामुळे टीम इंडिया कॅबफूटवर गेली. त्यानंतर अखेरीस श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि रविंद्र जडेजाने संघाला सावण्याचा प्रयत्न केला. मात्र, टीम इंडियाला 300 धावा देखील करता आल्या नाहीत. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 81 धावा केल्या. तर मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी 4 गडी टिपले.
आणखी वाचा - Glenn Maxwell Catch : पापणी पण लवली नाय अन् मॅक्सवेलने घेतला खतरनाक कॅच; पाहा Video
टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भर उन्हात कांगारू फलंदाजीसाठी उतरले. पीच पाटा असल्याने ऑस्ट्रेलियाने दमदार सुरूवात केली. डेव्हिड वॉर्नरने आक्रमण सुरू केलं अन् पहिल्या 9 ओव्हरमध्ये 80 धावा खेचल्या. वॉर्नर बाद झाल्यावर मिशल मार्श आणि स्टीव्हन स्मिथ यांनी 137 धावांची भागेदारी केली. मिशल मार्शने 97 धावांची खेळी केली. त्यानंतर स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन यांनी अनुक्रमे 74 आणि 72 धावांची खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 352 धावा स्कोरबोर्डवर लावता आल्या अन् भारतासमोर 353 धावांचं डोंगराएवढं आव्हान ठेवलं. भारताकडून बुमराहने 81 धावा देत 3 विकेट घेतल्या.