World Test Championship 2023: तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 182 धावांनी पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेच्या दारूण झालेल्या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत भारताचं दुसरं स्थान जैसे थेच आहे. तर ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी कायम आहेत. गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या दोन संघांना अंतिम खेळण्याची संधी मिळते. ऑस्ट्रेलियाला 12 गुण झाले असून 14 सामन्यात 132 पॉईंट्स झाले आहेत. या विजयासह ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 78.57 टक्के आहे. म्हणजे पुढच्या वर्षी ओव्हल मैदानात होणाऱ्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया खेळेल. अजूनही ऑस्ट्रेलियाला पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यापैकी 1 ऑस्ट्रेलिया, तर 4 भारताविरुद्ध खेळायचे आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेलबर्नमध्ये दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव झाल्याने भारताची विजयी टक्केवारी 58.93 टक्के इतकी आहे. या गुणांसह भारत दुसऱ्या स्थानी कायम आहे. तर श्रीलंका 53.33 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानी, तर दक्षिण आफ्रिका 50 टक्क्यांसह चौथ्या स्थानी आहे.


क्रमांक संघ विजयी टक्केवारी गुण
1 ऑस्ट्रेलिया 78.57 132
2 भारत 58.93 99
3 श्रीलंका 53.33 64
4 दक्षिण आफ्रिका 50 72
5 इंग्लंड 46.97 124
6 वेस्ट इंडिज 40.91 54
7 पाकिस्तान 38.89 56
8 न्यूझीलंड 25.93 28
9 बांगलादेश 11.11 16

अंतिम फेरीपर्यंत भारताचा प्रवास असा असेल


  • भारताने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत 4-0 ने पराभूत केलं तर अंतिम फेरीतील स्थान निश्चित आहे. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला उर्वरित सामने जिंकूनही अंतिम स्थान मिळवता येणार नाही.

  • भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला 3-0 ने पराभूत केल्यास अशीच स्थिती असणार आहे.

  • जर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावली किंवा ड्रॉ झाली तर भारताची अडचण वाढणार आहे. या स्थितीचा श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेला फायदा होऊ शकतो.


बातमी वाचा- T-20 World Cup 2023 साठी BCCI कडून टीम इंडियाची घोषणा


पहिल्या वर्ल्डकप टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताला न्यूझीलंडनं पराभूत केलं होतं. 2021 मध्ये झालेल्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताने सर्वबाद 217 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडने सर्वबाद 249 धावा केल्या. न्यूझीलंडकडे 32 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात भारताला 170 धावा केल्या आणि 138 धावांचं आव्हानं दिलं. न्यूझीलंडने हे आव्हान 2 गडी गमवून पूर्ण केलं.