तब्बल 24 वर्षानंतर `हा` संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
24 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर हा संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. पीसीबीने (PCB) ट्विट करत या दौऱ्याची माहिती दिली आहे.
इस्लामाबाद : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम (Australia Cricket Team) तब्बल 24 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर (Australia Tour Pakistan 2022) जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) याबाबतची माहिती दिली आहे. मार्च 2022 पासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा हा पाकिस्तान दौरा जवळपास 1 महिन्यांचा असणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया पाकिस्तान विरुद्ध कसोटी, वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. पीसीबीने या संपूर्ण दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. (Australia cricket team to tour Pakistan for the first time in 24 years see full schedule)
असा असेल दौरा
ऑस्ट्रेलिया पाकिस्तान विरुद्ध 3 कसोटी सामन्यांची मालिका, 3 वनडे मॅचेस आणि 1 टी 20 मॅच अशा एकूण 3 मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात ही कसोटी मालिकेपासून होणार आहे. तर टी 20 सामन्याने दौऱ्यांची सांगता होणार आहे.
संपूर्ण दौऱ्यातील मालिकानिहाय वेळापत्रक
पहिली कसोटी - 3 ते 7 मार्च, कराची
दुसरी कसोटी - 12 ते 16 मार्च, रावलपिंडी
तिसरी कसोटी - 21 ते 25 मार्च, लाहोर
एकदिवसीय मालिका
पहिला सामना - 29 मार्च
दुसरा सामना - 31 मार्च
तिसरा सामना - 2 एप्रिल
एकमेव टी 20 मॅच - 5 एप्रिल, लाहोर
अनेक दृष्टीने दौरा महत्तवपूर्ण
ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा हा अनेक दृष्टीने महत्तवपूर्ण आहे. कारण गेल्या मोठ्या काळापासून अनेक संघ हे पाकिस्तान दौऱ्यावर गेलेले नाहीत. नुकतेच सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडने पाकिस्तान दौरा अर्धवट सोडून माघारी आले होते.
ऑस्ट्रेलियाचा 24 वर्षांनी पाकिस्तान दौरा
ऑस्ट्रेलिया याआधी 1998-99 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेली होती. त्यावेळेस मार्क टेलरच्या नेतृत्वात कसोटी मालिकेत 1-0 ने विजय मिळवला होता. यानंतर 2002 मध्ये ऑस्ट्रेलियाने दौऱ्याआधी पाकिस्तानमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता.
त्यामुळे या मालिकेचं आयोजन हे कोलंबो आणि यूएईमध्ये करण्यात आलं होतं. यानंतर 2009 मध्ये श्रीलंका क्रिकेट टीम पाकिस्तान दौऱ्यावर गेली होती. तेव्हा श्रीलंकेच्या बसवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामुळे पाकिस्तानात अनेक वर्षभरापासून सुरु असलेल्या क्रिकेटला ब्रेक लागला.