मुंबई: वेस्टइंडिज टूरसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचं आणि कौतुकास्पद बाब म्हणजे भारतीय वंशाच्या टॅक्सी चालकाच्या मुलाची या संघात निवड झाली आहे. संघामध्ये डेव्हिड वॉर्नर, स्टिव स्मिथ आणि पॅट कॉमिन्सन देखील असणार आहेत. तर कोरोना नियमांमुळे  मार्नस लाबुशेनची निवड करण्यात आलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्टइंडिज टूरसाठी ऑस्ट्रेलिया संघात 19 वर्षांच्या भारतीय वंशाच्या तनवीर संघाची निवड करण्यात आली आहे. तनवीरचे वडील टॅक्सी चालवण्याचं काम करतात. तनवीर गेलब्रेक गुगली गोलंदाजी करणार आहे. इतक्या कमी वयात संघात अढळ स्थान निर्माण करण्याचं आव्हान त्याच्यासमोर असणार आहे. 




तनवीरने दक्षिण अफ्रिकेत झालेल्या अंडर 19 वर्ल्डकपमध्ये आपली दमदार कामगिरी दाखवली होती. त्याने 15 विकेट्स काढल्या होत्या. त्याची कामगिरी पाहून त्याला वेस्टइंडिज टूरस्थाठी संधी देण्यात आली आहे. तनवीरचं सर्वत्र कौतुक देखील होत आहे.


तनवीरचे वडील मूळचे पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील रहीमपूर गावाचे आहेत. 1997मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षणासाठी ते आले होते. त्यानंतर पुढे ऑस्ट्रेलियामध्येच राहण्याचा निर्णय घेतला. सिडनी इथे राहणाऱ्या जोगा संघा पेशानं टॅक्सी चालक आहेत. तर त्याची आई उपनीत अकाऊंटट म्हणून काम करते.