`इथून परत जाता येणार नाही`, पाकिस्तानमध्ये पोहचलेल्या या क्रिकेटरला धमकी
स्टार क्रिकेटपटूला ( cricketer) जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम २४ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर (australia tour pakistan 2022) गेली आहे. ऑस्ट्रेलिया टीम पाकिस्तानमध्ये रविवारी दाखल झाली. ऑस्ट्रेलिया 6 आठवड्यांच्या या दौऱ्यात तीन टेस्ट, तीन वनडे आणि एक टी-20 सामना खेळणार आहे. मात्र या मालिकेपूर्वीच वाद सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूला पाकिस्तानात न येण्याची धमकी देण्यात आली आहे. (australia tour pakistan 2022 ashton agar controversy social media know all matter)
पाकिस्तानात पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला धमक्या मिळू लागल्या आहेत. ऑस्ट्रेलियन संघाचा स्टार ऑलराऊंडर एश्टन एगरला (Australian cricketer Ashton Agar receives death threat) पाकिस्तानात न येण्याची धमकी दिली आहे. सोशल मीडियावरुन ही धमकी देण्यात आली आहे. एश्टनच्या मैत्रिणीला धमकी देण्यात आले आहे.
पाकिस्तानात येऊ नको, पाकिस्तानात आलात, तर जिवंत परतणार नाही, असा मेसेज एशटनच्या मैत्रीणाला इंस्टाग्रामवरुन करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
ऑस्ट्रेलिया टीम 1998 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर आली होती. श्रीलंका क्रिकेट टीमच्या बसवर 2009 मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हापासून अनेक टीम पाकिस्तानात येत नाहीत.
लाहोरमधील चर्चमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटानंतर ऑस्ट्रेलियाने 5 वर्षांपूर्वी आपला दौरा रद्द केला होता. गेल्या 6 वर्षांत झिम्बाब्वे, श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका हे संघ पाकिस्तानमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळले आहेत. मात्र ऑस्ट्रेलिया संपूर्ण द्विपक्षीय मालिकेसाठी पाकिस्तान दौरा करणारी पहिलीच टीम आहे.