Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धा आता हळूहळू रंगतदार वळणावर येत आहे. वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारताला मिळालं असून ओडिशातील भुवनेश्वस आणि राउरकेला येथे आयोजन करण्यात आलं आहे. क्रिकेटवेड्या भारतात तसं पाहिलं तर हॉकीबाबत इतकी चर्चा रंगत नाही. मात्र यंदाच्या विश्वचषकात वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. देश विदेशातील समालोचकांसोबत खेळाडूही आपलं मत व्यक्त करत आहेत. कलिंगा आणि बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियममधील उपाययोजना पाहून खेळाडू आनंदी आहेत. त्यात मैदानात सामना पाहण्यासाठी होणारी गर्दी पाहून खेळाडूंचा ऊर भरून येत आहे. "आम्ही मागच्या 4-5 वर्षात हे मैदान तयार होताना पाहिलं आहे. खेळाडूंना या मैदानात खेळण्याचा वेगळाच आनंद मिळत आहे. जगातील सर्वोत्तम मैदानापैकी एक आहे.", असं ऑस्ट्रेलियन कोच कोलिन बॅच यांनी सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियन कर्णधार इडी ओकेन्डेनच्या यांनी सांगितलं की, "इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहात असल्याने खेळण्याचा वेगळाच आनंद मिळत आहे. प्रत्येक खेळाडूला अशा वातावरणात खेळायची इच्छा असते. येत्या काही सामन्यात प्रेक्षकांची अशीच साथ मिळेल."


बातमी वाचा- "हॉकी वर्ल्डकप स्पर्धेसाठी आखलेली रणनिती एकदम बेस्ट", गोलकीपर पीआर श्रीजेशचं वक्तव्य


भारताची हॉकी वर्ल्डकपमधील स्थिती


ग्रुप डी मध्ये भारत, वेल्स, इंग्लंड आणि स्पेन हे चार संघ आहेत. इंग्लंड आणि भारताने एक एक सामना जिंकला आहे. तर भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना बरोबरीत सुटल्याने प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. भारत आणि इंग्लंडच्या पारड्यात प्रत्येकी तीन गुण आहेत. मात्र इंग्लंडची गोलची संख्या पाहता पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी पुढील सामना महत्त्वाचा आहे. 19 जानेवारील इंग्लंड विरुद्ध स्पेन आणि भारत विरुद्ध वेल्स हा सामना रंगणार आहे. ग्रुप डी मधील सलामीच्या संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळणार आहे.