नवी दिल्ली :  ऑस्ट्रेलियात खेळण्यात आलेल्या एका स्थानिक सामन्याची चर्चा सध्या जगभरात आहे. ३५ षटकांच्या सामन्यात धावांचा डोंगर लावण्यात आला. 
 
 ग्रेड बी च्या एका क्लबचा क्रिकेटर जॉश डंस्टन याने तिहेरी शतक ठोकले आणि वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली. 
 
 हा सामना वेस्टा ऑगस्टा आणि सेंट्रल स्टर्लिंग यांच्यात झाला. वेस्ट ऑगस्टाचा फलंदाज जॉश डंस्टन याने तुफान फटकेबाजी करत३०७ धावांची खेळी केली. मजेदार गोष्ट अशी की संपूर्ण टीमचा स्कोअर ३५४ आहे त्यातील ३०७ धावा डंस्टन यांच्या आहेत. 



डंस्टनने लगावले ४० षटकार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या टीमकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या डंस्टन याने मैदानावर आल्यावरच जलदगतीने धावांचा पाऊस पाडला. डंस्टनने खूप आक्रमक फलंदाजी करत ४० षटकार लगावले. डंस्टनने नाबाद ३०७ धावा केल्या.   


 



भारताच्या मोहितनेही केला होता हा कारनामा 


भारताच्या मोहित अहलावत याने टी-२० सामन्यात अशी धमाकेदार खेळी केली होती. २१ वर्षी क्रिकेटरने ट्रिपल सेंच्युर लगावली होती. दिल्लीच्या रणजी टीमचा हिस्सा असलेल्या २१ वर्षीय मोहितने फेब्रुवारी २०१७ मध्ये ७२ चेंडूत ३०० धावा ठोकल्या होत्या. यात त्यने ३९ षटकार आणि १४ चौकार लगावले होते. यातील २३४ धावा षटकारातून आणि ५६ धावा चौकारातून बनविल्या होत्या.