मुंबई: क्रिकेटच्या मैदानात जसे मजेशीर किस्से घडत असतात तसेच मैदानाबाहेरही मजेशीर गोष्टी घडत असतात. मैदानात विकेट घेतानाची हटके स्टाइल असो किंवा विकेटनंतर डान्स करण्याची स्टाइल असो कायमच त्याची चर्चा होत असते. मात्र एका खेळाडूची चर्चा त्याच्यासोबत घडलेल्या प्रसंगामुळे झाली. हा किस्सा तर कायमच लोकांचा लक्षात राहिल असा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट विश्वात असे काही खेळाडू असतात ज्यांची गोलंदाजी खूपच चांगली असते मात्र फलंदाजीत ते मार खातात आणि ट्रोल देखील होतात.  अशाच एक ऑस्ट्रेलियान बॉलरचा हा जबरदस्त किस्सा आहे. ऑस्ट्रेलियाच्या बर्ट आयरनमोंगर यांची गोलंदाजी जबरदस्त होती. त्यांनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. मात्र बॅटिंगच्या बाबत ते क्रिझवर टिकतील की नाही याची शंका जगभरात होती. 


 बर्ट आयरनमोंगर जेव्हा जेव्हा क्रिझवर फलंदाजीसाठी जायते तेव्हा तेव्हा त्यांचा पत्नीला सर्वजण फोन करायचे आणि त्याबद्दल बोलायचे. बर्ट यांच्या पत्नीचा किस्सा देखील खूप प्रसिद्ध आहे. हा किस्सा खरंच घडला होता की नुसतीच चर्चा आहे हे मात्र समजू शकलं नाही.


बर्ट जेव्हा क्रिझवर फलंदाजीसाठी उतरले होते तेव्हा त्यांच्या पत्नीचा फोन ड्रेसिंग रूममध्ये आला होता. तिथल्या लोकांनी बर्ट फलंदाजीसाठी उतरल्याचं सांगितलं. त्यावर पत्नी म्हणाली ठिक आहे मी होल्ड करते. त्यांच्या या एवढ्याच वाक्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो. त्यांच्या पत्नीला किंवा क्रिकेट विश्वातच नाही तर सर्वांनाच हे ठाऊक होतं बर्ट क्रिझवरून किती मिनिटांत ड्रेसिंग रूममध्ये पोहोचणार.


 बर्ट आयरनमोंगर यांनी टेस्ट करियरमध्ये केवळ 43 धावा केल्या आहेत. तर 21 पैकी 5 डावांमध्ये नाबाद राहिले आहेत. सर्वात वाईट फलंदाज म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. मात्र त्यांनी स्वत:च्या नावावर अनेक रेकॉर्डही केले आहेत. 


टेस्ट मॅचमध्ये त्यांनी सर्वोत्तम प्रदर्शन केलं आहे. त्यापैकी एका मॅचमध्ये तर 6 रन देऊन 5 विकेट्स घेतल्या होत्या. 14 टेस्ट मॅचमध्ये त्यांनी 74 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. एका सामन्यात 10 पेक्षा जास्त विकेट्स घेऊन कमी रन देण्याचा रेकॉर्डही त्यांच्या नावावर आहे. हा रेकॉर्ड त्यांनी दक्षिण अफ्रिकेसोबत झालेल्या सामन्यात केला होता.