नवी दिल्ली : भारताच्या सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेची विजयी सुरुवात केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्याच फेरीत सायनाने दक्षिण कोरियाच्या चौथ्या मानांकित स्योंग जी ह्यूनचा २१-१०, २१-१६ अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला.


सायना ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची गतविजेती आहे, पण तिच्यासमोर असणारी प्रतिस्पर्धी तितकीच तुल्यबळ असल्यामुळे  या सामन्याकडे लक्ष लागले होते.


पहिल्या सेटपासून सायनाकडे ६-१ अशी आघाडी होती. ती आघाडी सायनाने अखेरपर्यंत कायम ठेवली होती. पहिल्या सेटमध्ये स्योंग ह्यूनने सायनला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सायनाने तिला परत सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही. अखेरच्या काही क्षणांमध्ये सायनाकडे २०-९ अशी आघाडी होती, जी कायम ठेवत सायनाने पहिला सेट जिंकला.


दुसऱ्या सेटची सुरुवात स्योंग ने आक्रमकतेने करत झटपट २ पॉईंट मिळवले. मात्र सायनाने तिला जशास तसं उत्तर देत लगेचच सेटमध्ये बरोबरी साधली. यानंतर काही काळ सामना बरोबरीत सुरु होता. 


दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असताना सायनाने जिगरबाज खेळ करत १५-११ गुणांवरुन १५-१५ अशी बरोबरी साधली. आणि यानंतर सायनाने स्योंगला परत डोकं वर काढायची संधीच दिली नाही. सलग ४ पॉईंट मिळवत सायनाने पहिला सामना जिंकला.