मुंबई : कोरोना व्हायरसचं संकट पाहता या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी आयपीएलच्या हंगामाचं आयोजन दुबईमध्ये करण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या या क्रिकेटच्या रणसंग्रामाला दर दिवसागणिक नवे रंग चढताना दिसत आहेत. असं असलं तरीही क्रीडारसिकांना यंदा मयंती लँगर या अँकरची अनुपस्थिती मात्र जाणवत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IPL 2020 सुरु होण्यापूर्वीच मयंती यंदा आयपीएलमध्ये सहभागी होणार नसल्याचं म्हटलं गेलं. ज्यामुळ अनेकांचीच निराशाही झाली. महिला अँकर्समध्ये अग्रस्थानी असणाऱ्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या मयंती हिनं आय़पीएलपासून दूर राहत यंदा एका महत्त्वाच्या कामालाच प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे. 


यंदा आपण आयपीएलमध्ये सहभागी का होणार नाही, याबाबतचं कारण मयंतीनंच सर्वांपुढं ठेवलं होतं. मुलाच्या जन्मानंतर क्रिकेट अँकरिंगपासून तिनं थोडी विश्रांती घेण्याचं ठरवलं. सध्या ती संपूर्ण वेळ कुटुंबासमवेत व्यतीत करत आहे. सोशल मीडियावर ती, पती स्टुअर्ट बिन्नी आणि आपल्या मुलासोबतचे अनेक फोटो आणि स्टेटसही शेअर करत आहे. 



 


मयंती यंदा आयपीएलमध्ये नसणं ही चाहत्यांसाठी निराशेची बाब असली तरीही, कुटुंबाला वेळ देणारं मयंतीचं हे रुपही सर्वांची मनं जिंकत आहे. सोशल मीडियापासून ते क्रिकेट वर्तुळातही या लोकप्रिय अँकरची चर्चा अद्यापही सुरुच आहे. त्यामुळं आता मयंती पुन्हा एकदा तिच्या त्याच रुपात केव्हा सर्वांसमोर येते हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे.