नवी दिल्ली : टीम इंडियाचा 'हिटमॅन' अर्थात रोहित शर्माने श्रीलंकेविरोधात टी-२० मॅटमध्ये ३५ बॉल्समध्ये सेंच्युरी लगावली. रोहितने केलेल्या या कारनाम्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माची चर्चा होत असताना आता आणखीन एका क्रिकेटरने नवा रेकॉर्ड केला आहे. या क्रिकेटरने अवघ्या २६ बॉल्समध्ये सेंच्युरी लगावली आहे.


पाकिस्तानचा स्फोटक बॅट्समन बाबर आजम याने क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद सेंच्युरील लगावली आहे. आजमने हा कारनामा टी-१० क्रिकेटमध्ये केला आहे. 


पाकिस्तानचा बॅट्समन बाबर आजम याने फैसलाबाद येथे शाहिद अफ्रिदी फाऊंडेशनद्वारा आयोजित टी-१० चॅरिटी मॅचमध्ये स्फोटक इनिंग खेळत इतिहास रचला आहे.


बाबर आजमने आपल्या इनिंगमध्ये ११ सिक्सर आणि ७ फोर लगावले. आजमने ९४ रन्स हे केवळ फोर आणि सिक्सरने बनवले. तर, ६ रन्स हे धावून काढले. संपूर्ण इनिंगमध्ये बाबर आजमचा स्ट्राईक रेट ३८४.६ होता.


शाहिद अफ्रिदी फाऊंडेशन रेडच्या टीमने प्रथम बॅटिंग करताना १० ओव्हर्समध्ये २०१ रन्स केले. रेड टीमकडून शोएब मलिकने धडाकेबाज बॅटिंग केली. त्याने २० बॉल्समध्ये ८४ रन्स केले. या इनिंगमध्ये त्याने एका ओव्हरमध्ये ६ सिक्सर लगावले. तर, फखर जमान याने २३ बॉल्समध्ये ७६ रन्स केले.


रेड टीमने दिलेलं २०२ रन्सचं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या ग्रीन टीमने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवला. बाबरने अवघ्या २६ बॉल्समध्ये सेंच्युरी लगावत सर्व क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली.