मुंबई : आयपीएलच्या ११ व्या सीजनमध्ये आज दुसरा सामना कोलकातामध्ये रंगणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये हा सामना रंगणार आहे. रविवारी रात्री 8 वाजता हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात दिनेश कार्तिक पहिल्यांदा केकेआरचा कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. विराटची टीम देखील सामना जिंकून चांगली सुरुवात करण्याच्या प्रयत्नात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅच आधी दोन्ही संघासाठी एक बॅडन्यूज आहे. कोलकातामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मॅचवर याचा प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे. आस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिशेल स्टार्क दुखापतीमुळे कोलकातासाठी या सीजनमध्ये नाही खेळू शकणार. त्याच्या जागी मिशेल जॉनसनवर बॉलिंगची जबाबगदारी असेल. स्टार्कच्या जागी इंग्लंडच्या टॉम कुरेनला संघात जागा देण्यात आली आहे. भारताला अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळून देणारा कमलेश नागरकोटी आणि शिवम मावी हे कोलकाताकडून खेळणार आहे. कुलदीप यादव, पीयूष चावला आणि वेस्टइंडिजचा सुनील नरेन हे कोलकाताकडे असलेले चांगले बॉलर आहेत.


टीम : 
कोलकाता : दिनेश कार्तिक (कर्णधार), सुनील नरेन, आंद्रे रसेल, क्रिस लिन, रोबिन उथप्पा, कुलदीप यादव, पीयूष चावला, नितीश राणा, कमलेश नागरकोटी, शिवम मावी, मिशेल जॉनसन, शुभमन गिल, विनय कुमार, रिंकू सिंह, कॅमरू डेलपोर्ट, जेवन सीयरलेस, अपूर्व वानखेड़े, इशांक जग्गी, टॉम कुरेन. 


बंगळुरु : विराट कोहली (कर्णधार), अब्राहम डिविलियर्स, सरफराज खान, क्रिस वोक्स, युजवेंद्र चहल, ब्रेंडन मैक्कलम, वॉशिंगटन सुंदर, नवदीप सैनी, क्विंटन डी कॉक, मोहम्मद सिराज, कोरी एंडरसन, कोलिन डी ग्रांडहोम, मुरुगन अश्विन, पार्थिव पटेल, मोइन अली, मनदीप सिंह, मनन वोहरा, पवन नेगी, टिम साउदी, कुलवंत खेजरोलिया, अनिकेत चौधरी, पवन देशपांडे, अनिरूद्ध अशोक जोशी.