मुंबई : टीम इंडियाला पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जायचे आहे, जिथे 3 कसोटी, 3 वनडे आणि 4 टी-20 अशा सगळ्या प्रकारच्या सामन्यांमध्ये खेळायचे आहे. परंतु त्याआधीच टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे की, टीम इंडियामधील एक खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळू शकणार नाही. भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 17 डिसेंबर ते 26 जानेवारी दरम्यान होणार आहे. त्यामुळे या खेळाडूच्या खराब हेल्थ बाबत माहिती देत तो या सीरिजमध्ये खेळणार नसल्याचे सांगितले जात आहे.


टीम इंडियासाठी वाईट बातमी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरेतर भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड होणे कठीण झाले आहे. इनसाइडस्पोर्टच्या वृत्तानुसार, निवडकर्त्यांना हार्दिक पांड्याचे फिटनेस सिद्ध करून निवडीसाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला (एनसीए) अहवाल द्यावा लागणार आहे.


हा खेळाडू आफ्रिका दौऱ्यावर खेळू शकणार नाही


पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्याची दुखापत किरकोळ असल्याचे मानले जात होते आणि न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी त्याची निवड होण्याची शक्यता होती, परंतु तेव्हा ही तो दुखापतीमुळे तो बाहेर पडला.


फिटनेस वर प्रश्न उपस्थीत


बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एका मुलाखतीत सांगितले की, "दुखापत बरी होईपर्यंत आता हार्दिकला विश्रांती घ्यावी लागेल, जेणेकरून तो आपला फिटनेस सिद्ध करण्यासाठी लवकरच एनसीएला भेट देऊ शकेल, ज्याच्या आधारावर आम्ही दक्षिण आफ्रिकेत त्याच्या समावेशाबाबत निर्णय घेऊ." सध्या हार्दिक पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.


कसोटी क्रिकेट खेळणे कठीण


बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, 'सध्या तो कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी फिटनेसची पातळी पूर्ण करु शकत नाही. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला वेळ हवा आहे आणि विश्वचषकापूर्वी घडलेल्या गोष्टींची घाई आम्हाला करायची नाही. जर तो बरा झाला तर त्याची वनडे आणि टी-20 मालिकेसाठी निवड केली जाईल.