नवी दिल्ली : कुस्तीपटू बजरंग पुनियानं राजीव खेलरत्न पुरस्काराबाबत आता न्यायालयात न जाण्याचा निर्णय घेतलाय. ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्तच्या सल्ल्यानंतर बजरंगनं हा निर्णय घेतलाय. प्रतिष्ठित खेलरत्न पुरस्कारासाठी आपल्याला डावलण्यात आल्याबाबत आपण न्यायालयात जाणार, असं आधी बजरंगनं सांगितलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, आपले गुरु योगेश्वर दत्तसमवेत क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग यांची भेट घेतल्यानंतर बजरंगनं आपला निर्णय बदलला. अशा गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिप्सवर लक्ष केंद्रीत कर, असा सल्ला योगेश्वरनं त्याला दिल्यानं बजरंगनं आपला निर्णय बदललाय.


बजरंगनं राष्ट्रकूल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कुस्तीमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करुन दिलीय.