मुंबईचा आणखी एक पराभव, प्ले ऑफला जायच्या आशा धुसर
मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा 14 रननी विजय झाला आहे.
बंगळुरू : मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा 14 रननी विजय झाला आहे. या विजयाबरोबरच बंगळुरूनं प्ले ऑफला क्वालिफाय होण्याचं आव्हान कायम ठेवलं आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या मात्र प्ले ऑफला क्वालिफाय व्हायची आशा आता धुसर झाली आहे. बंगळुरूनं ठेवलेल्या 168 रनचा पाठलाग करताना मुंबईनं 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 153 रन केल्या. मुंबईकडून हार्दिक पांड्यानं सर्वाधिक 50 रन केल्या. बंगळुरूनं ठेवलेल्या 168 रनचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनिंगला आलेला ईशान किशन पहिल्याच बॉलला आऊट झाला. तर रोहित शर्मालाही त्याचं खातं उघडता आलं नाही. रोहितही पहिल्याच बॉलला पॅव्हेलियनमध्ये परतला. बंगळुरूच्या साऊदी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराजला प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या.
शेवटची ओव्हर पडली महागात
बंगळुरूची बॅटिंग सुरू असताना मुंबईच्या मिचेल मॅकलेनघनन टाकलेली शेवटची ओव्हर महागात पडली. मॅकलेनघनच्या शेवटच्या ओव्हरला बंगळुरूनं 24 रन केल्या.
या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा हा निर्णय मुंबईच्या बॉलरनी योग्य ठरवला आणि बंगळुरुला धक्के दिले. बंगळुरुचा ओपनर मनन व्होरानं सर्वाधिक 45 रन केल्या. मुंबईकडून हार्दिक पांड्यानं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर मॅकलेनघन, बुमराह आणि मार्कंडेला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
मुंबई प्ले ऑफच्या बाहेर?
या मॅचमध्ये पराभव झाल्यामुळे आयपीएलच्या प्ले ऑफला क्वालिफाय होणं मुंबईला आणखी कठीण होऊन बसलं आहे. मुंबईनं खेळलेल्या 8 पैकी 2 मॅचमध्ये विजय आणि 6 मॅचमध्ये पराभव झाला आहे. उरलेल्या 6 पैकी 6 मॅच जिंकल्या आणि इतर टीमच्या कामगिरीवरच मुंबईला प्ले ऑफला क्वालिफाय होणं आता शक्य होणार आहे.