मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूनं टॉस जिंकला
मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं टॉस जिंकला आहे.
मुंबई : मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून विराटनं पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा लागोपाठ चौथा टॉस हारला आहे. सुरुवातीच्या तिन्ही मॅचमध्ये मुंबईला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या मॅचमध्ये जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये अंक मिळवण्याचं आव्हान मुंबईच्या टीमपुढे असणार आहे. मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. मुंबईनं तिन्ही मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये हरल्या.
बंगळुरुचीही सुरुवात खराब
मुंबईप्रमाणेच या स्पर्धेमध्ये बंगळुरुचीही सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. बंगळुरूनं त्यांच्या तीनपैकी फक्त एकच मॅच जिंकली आहे. मुंबई आणि बंगळुरुच्या टीममध्ये आक्रमक बॅट्समन आहेत.
मुंबईला चिंता बॉलिंगची
मुंबईच्या टीमनं तिन्ही मॅचमध्ये स्कोअर केला होता पण बॉलरनी मोक्याच्या क्षणी रन दिल्यामुळे मुंबईला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. आत्तापर्यंत झालेल्या चारही मॅचमध्ये रोहित शर्मानं एकदाही टॉस जिंकला नाही. वानखेडे स्टेडियमवर लक्ष्याचा पाठलाग करणं सोपं जात असल्याचं मागच्या काही वर्षांच्या सामन्यांमधून दिसून आलं आहे.
मुंबईची टीम
सूर्यकुमार यादव, एव्हिन लुईस, ईशान किशन, रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, मिचेल मॅकलेनघन, मयंक मार्कंडे, जसप्रीत बुमराह, मुस्तफिझुर रहमान
बंगळुरूची टीम
विराट कोहली, क्विंटन डिकॉक, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, मनदीप सिंग, कोरे अंडरसन, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, क्रिस वोक्स, उमेश यादव, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज