नवी दिल्ली : ६ मार्चपासून श्रीलंकेत निडास ट्रॉफीची सुरुवात होत आहे. या टी-२० ट्राय सीरिजमध्ये भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. मात्र, सीरिज सुरु होण्यापूर्वीच बांगलादेश टीमला मोठा झटका बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेश टी-२० क्रिकेट टीमचा कॅप्टन शाकिब अल-हसन हा आगामी निडास ट्रॉफीत खेळणार नाहीये. शाकिब याच्या बोटाला दुखापत झाल्याने टीममधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


शाकिब अल-हसन याच्या अनुपस्थित टीमची धूरा महमुदुल्लाह सांभाळणार आहे. श्रीलंका आणि भारत यांच्या विरोधात खेळल्या जाणाऱ्या निडास ट्रॉफीत शाकिबच्या जागेवर बांगलादेशच्या टी-२० क्रिकेट टीममध्ये लिटन दास याचा समावेश करण्यात आला आहे.


२७ जानेवारी रोजी खेळण्यात आलेल्या वन-डे सीरिजच्या फायनल मॅचमध्ये शाकिब दुखापतग्रस्त झाला होता. मात्र, अद्याप जखम पूर्णपणे ठिक न झाल्याने शाकिबला विश्रांती देण्यात आली आहे.


टी-20 ट्रायसीरिजचं वेळापत्रक


६ मार्च- भारत विरुद्ध श्रीलंका


८ मार्च- भारत विरुद्ध बांग्लादेश


१० मार्च- श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश


१२ मार्च- भारत विरुद्ध श्रीलंका


१४ मार्च- भारत विरुद्ध बांग्लादेश


१६ मार्च- श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश


१८ मार्च- फायनल