Shakib Wearing lionel Messi Jersey : टीम इंडिया (Team India) सध्या बांगलादेशाच्या दौऱ्यावर आहे. यावेळी बांगलादेश आणि टीम इंडियामध्ये (India vs Banglades) टेस्ट सिरीज सुरु असून भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान दुसरी टेस्ट मॅच 22 डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. यासाठी बांगलादेश आणि टीम इंडिया या दोन्ही टीम सराव करतायत. मात्र यावेळी बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल् हसन (Shakib Al Hasan) एका वेगळ्याच लूकमध्ये दिसून आल्याने त्याने सर्वांचं लक्ष्य वेधून घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या आणि निर्णायक सामना गुरुवारी ढाकामध्ये खेळवला जाणार आहे. यासाठी दोन्ही टीम प्रॅक्टिस करत असताना बांगलादेशाचा कर्णधार शाकिब अल् हसनचा (Shakib Al Hasan) फोटो व्हायरल होताना दिसतोय. यामागे कारण होतं ते, त्याने अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू आणि कर्णधार लिओनेल मेस्सीची जर्सी घातली होती. आणि मुख्य म्हणजे तो क्रिकेटच्या मैदानावर फुटबॉल खेळत होता.


शाकिबला या आगळ्या-वेगळ्या रूपात पाहून चाहत्यांनाही आनंद झालाय. अनेक युझर्सच्या म्हणण्याप्रमाणे, शाकिब आता क्रिकेट सोडून फुटबॉल खेळणार असल्याचं म्हटलं आहे. तर काही युझर्सच्या म्हणण्यानुसार, शाकित बांगलादेश सोडून अर्जेंटीनाकडून फुटबॉल खेळताना दिसणार आहे. नुकतंच लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटीना टीमने फिफा वर्ल्डकप जिंकला असून त्याचं सगळीकडे कौतुक होतंय. अशातच शाकिबही मेस्सीचा फॅन असल्याचं दिसून येतंय.


अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू मेस्सीच्या जर्सीतील शाकिबचा फोटो सोशल मीडियावर आता चांगलाच व्हायरल होतोय. 


दुसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला अजून एक धक्का


येत्या 22 डिसेंबरला बांगलादेशविरूद्ध दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि बॉलर नवदीप सैनी (Navdeep Saini) शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर झाले आहे. या दोन्ही खेळाडूंना झालेल्या दुखापतीमुळे त्यांना कसोटी सामन्यातून वगळण्यात आले आहे.


दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया : केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उप कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेट किपर), केएस भरत (विकेट किपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मो. सिराज, उमेश यादव, अभिमन्यू इसवरन, सौरभ कुमार, जयदेव उनाडकट.