क्रिकेट हा जगातील दुसरा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. मात्र यातील सर्वच नियम हे सर्वसामान्यांना माहित असतीलच असे नाही. क्रिकेटचे नियम मेरीलेबोन क्रिकेट क्लबद्वारे घेतले जातात आणि ICC द्वारे लागू केले जातात. क्रिकेटमध्ये एक बॅट्समन हा तब्बल 11 प्रकारे आउट होऊ शकतो. तेव्हा या नियमांबद्दल जाणून घेऊयात. 


टाइम आउट नियम :


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅट्समन बाद झाल्यानंतर, नवीन बॅट्समन हा बॅटिंगसाठी निर्धारित वेळेत क्रीजवर पोहोचला नाही, तर त्याला टाइम आऊट असे म्हणतात. नियमांनुसार एक बॅट्समन बाद झाल्यावर नवीन बॅट्समनला तीन मिनिटांत मैदानात यावे लागते. जर नवीन बॅट्समनला मैदानात यायला उशीर झाला तर त्याला या नियमानुसार बाद घोषित केले जाते. 


रिटायर्ड आउट :


क्रिकेटमध्ये सामना सुरु असताना जर एखादा बॅट्समन हा अंपायर आणि विरोधी टीमच्या कर्णधाराच्या परवानगीशिवाय मैदान सोडतो तर त्याला रिटायर्ड आउट घोषित केले जाते. याचा अर्थ तो बॅट्समन पुन्हा मैदानात खेळण्यासाठी येऊ शकत नाही. 


बॉलला दोन वेळा बॅटने मारणे :


जेव्हा एखादा बॅट्समन बॉलरने टाकलेल्या बॉलला जाणीवपूर्वक बॅटने दोनवेळा मारतो. अशा परिस्थितीत त्या बॅट्समनला बाद घोषित केले जाते. आत्तापर्यंत केवळ ०.०१ टक्के बॅट्समन असे आउट झाले आहेत. 


फिल्डिंगमध्ये जाणीवपूर्वक बाधा निर्माण करणे :


जेव्हा एखादा बॅट्समन बॉलिंग करणाऱ्या टीमच्या फिल्डिंगमध्ये जाणीवपूर्वक बाधा निर्माण करतो तेव्हा त्या बॅट्समनला बाद घोषित केले जाते. उदाहरणार्थ, फिल्डिंग करणाऱ्या टीमने बॅट्समनला रन आउट करण्यासाठी स्टंपवर बॉल टाकला आणि बॅट्समनने मुद्दाम चेंडू रोखला, तर त्याला बाद घोषित केले जाते.


हिट विकेट :


क्रिजवर फलंदाजी करताना जर बॅट्समनची बॅट किंवा त्याच्या शरीराचा कोणताही भाग स्टंपला लागला तर त्याला हिट विकेट असे म्हणतात आणि बॅट्समनला बाद घोषित केले जाते. 


स्टंपिंग :


ज्यावेळी बॅट्समन आपल्या क्रीजमधून बाहेर येऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न करतो आणि बॉल बॅटशी संपर्क साधत नाही, तेव्हा यष्टीरक्षक चेंडू पकडतो आणि स्टंपिंग. अशावेळी बॅट्समनला स्टंप आऊट हा करार देऊन बाद घोषित केले जाते. 


हेही वाचा : 'या' युवा खेळाडूला बनायचंय भारतीय बॅडमिंटनमधला विराट कोहली


रन आउट :


एखादा बॅट्समन बॉल खेळल्यावर विकेट्सच्या दरम्यान धावून धावा काढत असतो आणि तो क्रीजवर येण्यापूर्वी विकेटकिपर चेंडू स्टंपमध्ये मारतो आणि स्टंपिंग करतो तेव्हा बॅट्समनला धावबाद म्हणजेच रन आउट घोषित केले जाते.


LBW आउट :


बॅट्समन बॅटशी संपर्क न करता स्टंपच्या बरोबरीने बॉलरने टाकलेला बॉल हा पॅडवर लागला, तेव्हा त्याला LBW आउट विकेट दिला जातो. 


कॅच आउट :


जेव्हा बॉल बॅट्समनच्या बॅटला लागतो आणि फिल्डर तो जमिनीवर आदळण्यापूर्वीच पकडतो तेव्हा बॅट्समनला कॅच आउट असा करार देऊन बाद घोषित केले जाते.


बोल्ड :


जेव्हा एखादा बॅट्समन बॅटिंग करत असताना बॉलेरने टाकलेला बॉल थेट स्टंपवर जाऊन आदळतो तेव्हा त्याला बोल्ड आऊट म्हणतात.


हॅण्डल द बॉल :


एखादा बॅट्समनने बॉल खेळला आणि तो बॉल जाणीवपूर्वक स्टंपला लागू नये म्हणून बॉल हाताने पकडला तर हे नियमांच्या विरुद्ध मानले जाते आणि हॅण्डल द बॉल या नियमाने त्याला बाद करार दिला जातो. रन आऊटप्रमाणे 'हँडल द बॉल'ची विकेटही बॉलेरच्या खात्यात जात नाही.