ऑकलॅँड : क्रिकेट खेळताना अनेक अजब गजब घटना घडतात. अशीच एक घटना न्युझीलॅंडच्या घरगुती क्रिकेटमध्ये घडली. फलंदाज खेळत होता. मात्र त्याचा शॉट इतका जबरदस्त होता की बॉल गोलंदाजाच्या डोक्याला लावून सिक्सर गेला. ही घटना न्युझीलॅंडच्या घरगुती क्रिकेटमधील ५० ओव्हर्सच्या फोर्ड ट्रॉफी स्पर्धेत घडली. 


पहा काय झाले नेमके?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅटरबरी टीमचा कर्णधार एलिस याने डोक्याला बॉल लागला तरी ओव्हर पूर्ण केली. आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठीही आला. ऑकलॅंडच्या खेळात १९ व्या ओव्हरमध्ये एलिस स्वतः गोलंदाजी करण्यास आला. मात्र बॉल त्याच्या डोक्याला लागला आणि बॉऊंड्री लाईन पार करून पलीकडे गेला. अम्पायरने चौकार असल्याचा इशारा केला. मात्र रिव्हूमध्ये तो षटकार असल्याचे निदर्शनास आले.


बॉल लागल्यानंतर एलिसकडे सर्वांनी धाव घेतली. सर्वांनी त्याची विचारपूस केली आणि पुन्हा तो खेळण्यासाठी सज्ज झाला. पण मजेदार गोष्ट ही की त्यानंतर एलिसने त्या फलंदाजाला आऊट केले आणि टीमला विजय प्राप्त करून दिला. जीतने मॅचनंतर सांगितले की, अशाप्रकारच्या घटना झाल्यानंतर तुम्हाला सर्वांतआधी मार लागलेल्या व्यक्तीची चिंता वाटते. बॉलचा जोरदार प्रहार त्याच्या डोक्यावर झाला होता. मात्र त्याचा मार गंभीर नव्हता ही आनंदाची गोष्ट आहे. 



टीमची कमाल


खेळात जीत रावलने १५३ बॉलमध्ये १० चौकार आणि ४ छटकारच्या मदतीने १४९ धावा केल्या. जीत रावलच्या माध्यमातून सामन्याची चांगली सुरूवात झाली. त्यानंतर क्रेग काचोपा (37) आणि रॉबर्ट ओडोनेल (40) च्या मदतीने टीमने ६ विकेट्स गमावून ३०४ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या कॅटरबरीची टीमची सुरूवात जरा वाईटच झाली. त्यांनी ८७ धावात ३ विकेट्स गमावल्या. कॅटरबरी ३७.२ ओव्हर्समध्ये १९७ धावा करत ऑलआऊट झाली. आणि ऑकलॅँड १०७ धावांनी विजयी झाली.