मुंबई : टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसरा टी २० सामना सहज खिशात टाकत मालिकाही जिंकली. रोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीने टीम इंडियाने धावांचा डोंगर उभा केला. असेही काही खेळाडू आहेत जे आपल्या फास्टेस्टे सेंच्युरीसाठी ओळखले जातात.


फोर लगावत केली रेकॉर्डची बरोबरी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदूरमधील होळकर स्टेडिअममध्ये रोहित शर्माने श्रीलंकेविरोधात खेळताना ११ फोर आणि ८ सिक्सर लगावत सेंच्युरी केली. रोहितने अँजिलो मॅथ्युज याच्या बॉलवर फोर लगावत डेविड मिलरच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. 


रोहित शर्मा


रोहित शर्माने २२ डिसेंबर २०१७ ला श्रीलंकेविरूद्ध ३५ चेंडूत शतक झळकावले. 


डेव्हिड मिलर


दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने २९ ऑक्टोबर २०१७ ला बांगलादेशविरूद्ध ३५ चेंडूत शतक पूर्ण केले. 


रिचर्ड लेव्ही


दक्षिण आफ्रिकेच्या रिचर्ड लेव्ही १० फेब्रुवारी २०१२ला न्यूझीलंडविरुद्ध ४५ चेंडूत शतक झळकावले.


लोकेश राहुल


भारताच्या लोकेश राहुलने ११ जानेवारी २०१५ ला वेस्ट इंडिज विरूद्ध ४६ बॉल्समध्ये १०० रन्स ठोकले


एरॉन फिंच


ऑस्ट्रेलियाच्या एरॉन फिंचने २९ ऑगस्ट २०१३ इंग्लंडविरूद्ध ४७ बॉल्समध्ये १०० रन्सची खेळी केली.


बनला पहिला भारतीय खेळाडू


अवघ्या ३५ बॉल्समध्ये सेंच्युरी लगावत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान सेंच्युरी करणारा रोहित हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. 


धडाकेबाज इनिंग


दुसऱ्या टी-२० क्रिकेट मॅचमध्ये रोहित शर्माने ४६ बॉल्समध्ये ११८ रन्स केले आहेत. यावेळी त्याने १२ फोर आणि १० सिक्सर लगावले आहेत.


ख्रिस गेलच्या नावावर रेकॉर्ड


टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड ख्रिस गेलच्या नावावर आहे. ख्रिस गेलने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या टीमकडून खेळताना पुणे वॉरियर्स विरोधात ३० बॉल्समध्ये सेंच्युरी केली आहे.