Arjun Tendulkar : महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंदुलकर (Arjun Tendulkar) आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) अर्जुनने उत्तम खेळ करत स्वतःचं नाणं खणखणीत बजावलं आहे. मात्र यावेळी गोलंजादीमध्ये नाही तर फलंदाजीमध्ये  त्याने त्याची जादू दाखवली आहे. गोव्याकडून खेळताना हरियाणाविरूद्ध (Goa vs haryana) अर्जुनने चांगली गोलंदाजी तर केलीच याशिवाय 10 व्या नंबर फलंदाजी करतानाही गोलंदाजांना रडवलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने 4 ओव्हरमध्ये 1 विकेट पटकावला. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट 5.50 इतका होता. शिवाय त्याने 1 मेडन ओव्हर देखील फेकली. तर दुसरीकडे जेव्हा टीमला गरज होती तेव्हा त्याने 10 व्या क्रमांकावर उतरत 1 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 6 बॉल्समध्ये 14 रन्सची खेळी केली. यावेळी त्याने 233.33 च्या स्ट्राईक रेट


विजय हजारे ट्रॉफीमध्ये अर्जुनचा परफॉर्मन्स चांगला राहिलाय. या टूर्नामेंटमध्ये त्याने 7 सामन्यात 4.98 च्या इकोनॉमीने 8 विकेट्स घेतले. अर्जुन तेंडुलकर हा गोलंदाज आहे मात्र त्याच्या खेळाने त्याच्यामध्ये फलंदाजीची क्षमता असल्याचंही समोरं आलंय. सध्या टीम इंडियामध्ये हार्दिक पंड्याच एक असा खेळाडू आहे, जो ऑलराऊंडर आहे. अर्जुनचा खेळ असाच राहिला तर टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी लवकरच खुले होतील.


अर्जुन तेंडुलकरची आतापर्यंतची कामगिरी पाहिली तर त्याने 9 सामन्यांमध्ये 6.60 च्या इकोनॉमी रेटने 12 विकेट्स घेतल्या आहे. आयपीएल ऑक्शन 2023 पूर्वी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेत अर्जुन तेंडुलकरला रिटेन केलं होतं. मुंबईने अर्जुनला मेगा ऑक्शनमध्ये 30 लाख रूपयांना खरेदी केलं होतं.