Ind vs Eng 4th Test : टीम इंडियाला `जोर का झटका`, Jasprit Bumrah याच्यासह स्टार खेळाडू संघातून `आऊट`
Ind vs Eng Ranchi Test : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) रांची येथे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे.
Jasprit Bumrah released from squad : येत्या 23 फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी (Ind vs Eng 4th Test) सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. अशातच आता चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला दुहेरी झटके बसले आहेत. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) रांची येथे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. मालिकेचा कालावधी आणि अलीकडच्या काळात त्याने किती क्रिकेट खेळले हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं बीसीसीआयने (BCCI) सांगितलं आहे. तर केएल राहुल (KL Rahul) चौथ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. धर्मशाला येथील अंतिम कसोटी सामन्यात त्याचा सहभाग फिटनेसवर अवबंलून असेल, असंही बीसीसीआयने सांगितलं आहे.
जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल संघाचा भाग नसल्याने रोहित शर्माला धक्काच बसलाय. पण बीसीसीआय एक गुड न्यूज देखील दिलीये. राजकोट येथील तिसऱ्या कसोटीसाठी संघातून मुक्त करण्यात आलेला मुकेश कुमार रांचीच्या संघात दाखल झाल्याची माहिती बीसीसीआयने दिलीये.
झारखंड क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या चौथ्या कसोटीत केएल राहुल आता तर संघातील रजत पाटीदारची सुट्टी होण्याची शक्यता होती. केएल राहुल सध्या 90 टक्के तंदुरुस्त असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने दिली आहे. मात्र, आता रजत पाटीदारचं संघातील स्थान कायम राहणार असल्याचं दिसतंय. तर फॉर्ममध्ये असलेल्या देवदत्त पडिक्कलला संधी मिळणार का? असा सवाल देखील विचारला जातोय.
हैदराबाद कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं अन् विशाखापट्टणम आणि राजकोट कसोटी सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवला. त्यामुळे आता टीम इंडियाने मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया मालिका खिशात घालणार आहे. त्यामुळे आता रोहितसेनेच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असेल.
चौथ्या कसोटीसाठी कशी असेल टीम इंडिया - रोहित शर्मा (C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (WK), केएस भरत (WK), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.