मुंबई : टीम इंडिया जुलै महिन्यात वेस्टइंडिज दौऱ्यावर (Team India Tour Of West Indies 2022) जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया वनडे आणि टी 20 सारिज खेळणार आहे. बीसीसीआयने (Bcci) विंडिज विरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. शुबमन गिलची टीममध्ये एन्ट्री झाली आहे. तर शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) या मालिकेसाठीचं नेतृत्व देण्यात आलं आहे. तर रवींद्र जाडेजाला (Ravindra Jadeja) उपकर्णधार करण्यात आलं आहे. (bcci announced team india squad against to west indies odi series shikhar dhawan give captaincy)


शिखर धवनकडे दुसऱ्यांदा कॅप्टन्सी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने टीम इंडियाचा स्टार ओपनर 'गब्बर' शिखर धवनला या सीरिजसाठी कॅप्टन केलं आहे. विशेष म्हणजे धवनची कॅप्टन म्हणून ही दुसरी वेळ ठरली आहे.  याआधी धवनने श्रीलंका दौऱ्यावर वनडे आणि टी 20 मालिकेत संघाचं नेतृत्व केलं होतं. तर रवींद्र जाडेजाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 


अनुभवी खेळांडूंना आराम, युवांना संधी


या एकदिवसीय मालिकेसाठी निवड समितीने अनुभवी खेळाडूंनी विश्रांती दिली आहे. तर युवा खेळाडूंना संधी दिली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली,  ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या खेळाडूंना ब्रेक देण्यात आला आहे. तर शुबमन गिलची टीममध्ये एन्ट्री झाली आहे.


वेस्टइंडिज विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : शिखर धवन (कॅप्टन), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, आणि अर्शदीप सिंग. 



वनडे सीरिजचं वेळापत्रक 


पहिला सामना, 22 जुलै, 7 वाजता
दूसरी वनडे,  24 जुलै, 7 वाजता
तिसरी मॅच,  27 जुलै, 7 वाजता