मुंबई : टी 20 वर्ल्ड कपमधील (T 20 World Cup 2021) आव्हान संपुष्टात आल्यानंतर टीम इंडिया (Team India vs New Zealand t 20 Series 2021) न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर (New Zeland Tour India 2021) येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (bcci announced team india squad for t 20 series against new zeland)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी 20 मालिकेचं वेळापत्रक 


पहिला सामना, बुधवार 17 नोव्हेंबर, जयपूर. 


दुसरा सामना, शुक्रवार 19 नोव्हेंबर, रांची. 


तिसरा सामना, रविवार, कोलकाता. 


न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.