BCCI announces annual player retainership : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी 2023-24 हंगामासाठी टीम इंडियासाठी वार्षिक खेळाडू करार जाहीर (Annual Player Contracts) केले आहे. हा वार्षिक करार 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहेत. 'ग्रेड ए प्लस'मध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या चार खेळाडूंना स्थान देण्यात आलंय. तर ग्रेड एमध्ये आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या या 6 खेळाडूंना स्थान दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रेड A+ खेळाडूंचा वार्षिक करार हा 7 कोटी असणार आहे. त्यामुळे रोहित-विराटसह जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना बीसीसीआयकडून 7 कोटी मिळणार आहेत. तर ग्रेड A खेळाडूमध्ये मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल यांच्यासह आर अश्विन शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे. या सहा खेळाडूंना बीसीसीआय 5 कोटीच्या करारावर खेळवणार आहे.


तर सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जयस्वाल यांना ग्रेड बी खेळाडूंना यंदाच्या वर्षी 3 कोटी दिले जाणार आहेत. त्याचबरोबर रिंकू सिंग, टिळक वर्मा, रुतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसीध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार या खेळाडूंना या वर्षी बीसीसीआयकडून खेळण्यासाठी प्रत्येकी 1 कोटी मिळतील.


ग्रेड A+: 7 कोटी
रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.


ग्रेड A: 5 कोटी
आर अश्विन, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, केएल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या.


ग्रेड B: 3 कोटी
सूर्य कुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.


ग्रेड C : १ कोटी
रिंकू सिंग, टिळक वर्मा, रुतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसीध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.



दरम्यान, या व्यतिरिक्त जे खेळाडू किमान 3 कसोटी किंवा 8 एकदिवसीय सामने किंवा 10 टी-ट्वेंटी सामने खेळतील त्या खेळाडूंना कालावधीत आपोआप ग्रेड सीमध्ये समाविष्ट केले जाईल, असं बीसीसीआयने सांगितलं आहे. तर निवड समितीने आकाश दीप, विजयकुमार विशक, उमरान मलिक, यश दयाल आणि विद्वथ कवेरप्पा या खेळाडूंसाठी वेगवान गोलंदाजी कराराची शिफारस देखील केली आहे.