BCCI Awards 2023: भारतीय क्रिकेटपटूंसाठी आजचा म्हणजेच 23 जानेवारीचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. हैदराबादमध्ये हा सोहळा आयोजित करम्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये 2 विशेष व्यक्तींचा सन्मान होणार आहे. यापैकी एकाने तर सध्याच्या घडीला आघाडीचे क्रिकेटपटू असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मागे टाकत एका विशेष पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे.


विराट-रोहितला टाकलं मागे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सायंकाळी हौदराबादमध्ये होणाऱ्या या विशेष सोहळ्यामध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रींना बीसीसीआयकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. शास्त्री हे मधल्या काळात भारतीय संघाचे प्रशिक्षकही होते. तसेच याहून विशेष म्हणजे विराट आणि रोहितला मागे टाकत एका तरुण खेळाडूने 2023 सालातील कामगिरीसाठी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारावर नाव कोरलं आहे. या खेळाडूचा सन्मानही आज केला जाणार आहे. आता विराट आणि रोहितला मागे टाकणारा हा खेळाडू कोण असा प्रस्न तुम्हाला पडला असेल तर त्या खेळाडूचं नाव आहे शुभमन गिल!


भारतीय संघही होणार सहभागी


बीसीसीआयने 2019 मध्ये पहिल्यांदा या वार्षिक पुरस्कारांचं आयोजन केलं होतं. बीसीसीआयच्या या सोहळ्यामध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणारा भारतीय संघही सहभागी होणार आहे. भारताविरुद्ध इंग्लंडचा संघ 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यापैकी पहिला सामना हैदराबादमध्ये परवा म्हणजेच 25 जानेवारीपासून सुरु होत आहे.


शमीलाही टाकलं मागे


विराट, रोहितबरोबरच मोहम्मद शमीला मागे टाकत शुभमन गिलने 2023 मधील सर्वोत्तम भारतीय क्रिकेपटू होण्याचा मान मिळवला आहे. वेगवान गोलंदाज शमीने 2023 च्या वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करताना 24 विकेट्स घेतल्या होत्या. विराट आणि रोहितनेही वर्षभर दमदार कामगिरी केली होती. मात्र पुरस्कारावर शुभमनने नाव कोरलं आहे. 


त्याला फारच उत्तम गेलं 2023 चं वर्ष


शुभमन गिलसाठी 2023 चं वर्ष फारच उत्तम गेलं. तो या वर्षातील एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू ठरला. या एका वर्षात गिलने 5 शतकं लगावलं. तसेच गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 2 हजार धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला. गिलने 2023 मध्ये एकूण 29 एकदिवसीय सामन्यांमध्ये 63.36 च्या सरासरीने 1584 धावा केल्या. यामध्ये त्याने 5 शतकं आणि 9 अर्धशतकं झळकावली. याच वर्षी शुभमनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावत आपला सर्वोच्च 208 धावांचा स्कोअर केला. विराटने 2023 मध्ये 1377 तर रोहितने 1255 धावा केल्या.


दुसऱ्या क्रमांकावर विराट


कसोटी, एकदिवसीय क्रिकेट आणि टी-20 मध्ये गिल 2023 मध्ये एकूण 48 सामने खेळला. त्यामध्ये त्याने 46.54 च्या सरासरीने 2154 धावा केल्या. त्यानंतर 35 सामन्यामध्ये 66.06 च्या सरासरीने 2048 धावा करणाऱ्या विराटचा क्रमांक लागतो.


माजी क्रिकेटपटूचाही समान्मान


दुसरीकडे 61 वर्षी रवी शास्त्री सध्या कॉमेंट्रीच्या क्षेत्रातील आघाडीचं नाव आहे. रवी शास्त्रींनी भारतासाठी 80 कसोटी सामने आणि 150 एकदिवसीय सामने खेळले आहेत. रवी शास्त्री 2014 पासून 2016 दरम्यान भारतीय संघाचे निर्देशक राहिले आहेत. त्यानंतर त्यांनी 2021 पर्यंत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.


कोच असताना भारताची चमकदार कामगिरी


रवि शास्त्री यांच्या प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर सलग 2 कसोटी सामने जिंकले होते. मात्र रवी शास्त्रींच्या कार्यकाळात भारतीय संघाला आयसीसीची ट्रॉफी जिंकता आली नाही. मात्र भारतीय संघाने 2019 मध्ये वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. तर 2021 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचं उपविजेतेपद जिंकलं होतं. 


कुठे आणि किती वाजल्यापासून पाहता येणार सोहळा


सायंकाळी 6 वाजल्यापासून या सोहळ्याचं लाइव्ह प्रक्षेपण केलं जाणार आहे. जीयो सिनेमावर हा पुरस्कार सोहळा चाहत्यांना पाहता येणार आहे.