Sri Lanka vs India : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील खेळवला जाणारा चौथा सामना कोलंबोमधील प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. सध्या अव्वल स्थान गाठलेल्या टीम इंडियासमोर (Team India) आला श्रीलंकेचं आव्हान असणार आहे. हा सामना जिंकला तर टीम इंडियाचं फायनलचं (Asia Cup Final) तिकीट पक्कं होणार आहे. सलग तीन दिवस सामना खेळणाऱ्या टीम इंडियाला आता मोठा धक्का बसल्याचं समोर आलं आहे. टीम इंडियाचा एक खेळाडू संघासोबत प्रवास करत असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. बीसीसीआयने (BCCI) देखील याची माहिती दिलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंका विरुद्धच्या सामन्यासाठी (Sri Lanka vs India) टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल करण्यात आला आहे. शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) याच्या जागी फिरकी गोलंदाज अक्षर पटेल (Axer Patel) याचा समावेश करण्यात आला आहे. तर टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) टीमसोबत प्रवास करत असल्याचं समोर आलंय. त्यावर बीसीसीआयने अधिकृत माहिती दिली.


बीसीसीआयने काय सांगितलं?


श्रेयस अय्यरला आधीपेक्षा बरं वाटत आहे. मात्र, त्याच्या पाठीच्या ताणाची समस्या अद्याप पूर्णपणे ठीक झाली नाहीये. त्याला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने विश्रांतीचा सल्ला देत श्रीलंकेविरुद्ध आशिया चषक सुपर- 4 सामन्यासाठी संघासोबत स्टेडिअममध्ये जाण्यास सांगितलं नाही. त्यामुळे टीमसोबत प्रवास करत नाही, असं बीसीसीआयने ट्विट करत सांगतिलं आहे.


दरम्यान, टीम इंडियाने या सामन्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानसोबतच्या विजयानंतर टीम इंडियाने नेट रनरेटमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. भारताचा सध्याचा रननेट 4.56 वर असल्याने आता फायनलचा मार्ग मोकळा होताना दिसतोय.



श्रीलंका : दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.


टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.