विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर मालामाल झाली U-19 टीम...
१९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप सिरीजमधील एकही मॅच न हारता जेतेपदावर आपले नाव कोरले.
नवी दिल्ली : १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप सिरीजमधील एकही मॅच न हारता जेतेपदावर आपले नाव कोरले. हा विजय पहिल्यांदाच नाही तर चौथ्यांदा भारताच्या वाट्याला आला आहे.
विजयानंतर इतके मिळणार बक्षीस
या विजयानंतर बीसीसीआयने १९ विश्व कप विजेती भारतीय टीमचे मुख्य कोच राहुल द्रविडला ५० लाखांचे बक्षीस प्रत्येक खेळाडूला ३० लाखांचे बक्षीस देण्याचे जाहिर केले आहे. त्याचबरोबर इतर सदस्य, फिल्डिंग कोच अभय शर्मा आणि गोलंदाजी कोच पारस म्हाम्ब्रेला २०-२० लाखांचे रोख बक्षीस देण्याचे जाहिर केले आहे.
शुभेच्छांचा वर्षाव
सीओएचे मार्गदर्शनाखाली बीसीसीआयने मुख्य कोचला सर्वात जास्त बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल एका जेष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, भारत गुरू-शिष्य परंपरेसाठी प्रसिद्ध आहे आणि गुरूला नेहमीच जास्त मिळते. कारण कोचचे मार्गदर्शन नेहमीच महत्त्वाचे ठरते. विजयाबद्दल टीमला शुभेच्छा देताना समितीचे प्रमुख विनोद राय म्हणाले की, मी अंडर १९ टीमला शुभेच्छा देतो. त्यांच्यामुळे देशाचा गौरव झाला. राहुल अगदी इमानदारीत क्रिकेट खेळला आणि तेच गुण तो त्याच्या शिष्यांमध्ये उतरवत आहे.