मुंबई : भारतीय महिला क्रिकेट निवड समितीने बुधवारी त्रिकोणिय टी-२० सीरिजसाठी भारतीय महिला क्रिकेट टीमची घोषणा केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामी हिला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरूद्ध टी-२० त्रिकोणिय क्रिकेट सीरिजसाठी टीममध्ये संधी देण्यात आली आहे. तर या टीमचं नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आलंय. तान्या भाटिया विकेटकीपर असेल. टीममध्ये जास्त बदल करण्यात आलेले नाही. स्मृति संधाना उपकर्णधार असेल. 


बीसीसीआयने सांगितले की, ‘निवड समितीने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसोबत २२ मार्चपासून सुरू होत असलेल्या त्रिकोणिय टी-२० सीरिजसाठी महिला टीमची घोषणा केली आहे. या सीरिजचे सर्व सामने मुंबईत खेळले जातील’. 


भारत त्रिकोणिय टी-२० सीरिजचा पहिला सामना २२ मार्चला मुंबईच्या सीसीआय स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळणार. त्यानंतर २३ मार्चला दुसरा सामना ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात असेल, २५ मार्चला तिसरा सामना भारत-इंग्लंड यांच्यात, २६ मार्चला भारत आणि ऑस्ट्रेलिया, २८ मार्चला पुन्हा ऑस्ट्रेलिया-इंग्लंड, २९ मार्चला भारत-इंग्लंड सामना होणार. या सीरिजचा फायनल सामना सीसीआय स्टेडियमवर ३१ मार्चला खेळला जाणार आहे. 


भारतीय महिला टिम : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंदाना (उपकर्णधार), मिताली राज, वेदा कृष्णमूर्ति, जेमिमाह रोड्रिगेस, अंजली पाटिल, दीप्ति शर्मा, तानिया भाटिया (विकेटकीपर), पूनम यादव, एकता बिष्ट, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वास्त्राकार, रुमेली धार आणि मोना मेशराम.