कराची : एप्रिल महिन्यामध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया इमर्जिंग नेशन कपमध्ये बीसीसीआयनं भारतीय टीम पाठवायला नकार दिला आहे. बीसीसीआयच्या नकारामुळे आता ही स्पर्धा होणार का नाही हा स्पर्धा आता पाकिस्तानमध्ये होणार का नाही यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत पाकिस्तानमध्ये त्यांची टीम पाठवू इच्छीत नाही त्यामुळे आशिया इमर्जिंग नेशन कप श्रीलंका किंवा बांग्लादेशमध्ये होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.


आशिया कपही गोत्यात


आशिया इमर्जिंग नेशन कप आणि सप्टेंबरमध्ये भारतात होणाऱ्या आशिया कपमध्ये सहभागी व्हायचं का नाही, यावर शेवटचा निर्णय कोलंबोमध्ये होणाऱ्या बैठकीत होईल, असा इशारा पीसीबीचे चेअरमन नजम सेठी यांनी दिला आहे. भारतात होणाऱ्या आशिया कपमध्ये काही अटी आणि शर्तींवरच पाकिस्तानची टीम सहभागी होईल, असं नजम सेठी म्हणाले.


मला भारतामध्ये जाण्यात कोणतंही स्वारस्य नाही. भारतानं मला विजा दिला तर एप्रिलमध्ये कोलकात्यामध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीला मी जाईन पण आयसीसीनं माझ्या विजाची व्यवस्था करावी, अशी मागणी सेठींनी केली आहे.