BCCI President Election 2022 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्‍या (BCCI President Election) अध्‍यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्‍ती झाली आहे. (Roger Binny is Elected BCCI New President ) उपाध्‍यक्षपदी राजीव शुक्‍ला तर सचिवपदी  जय शहा  तर कोषाध्‍यक्षपदी भाजप नेते आशिष शेलार यांची बिनविरोध निवड झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आज मुंबईतील ताज हॉटेलमध्‍ये निवडणूक पार पडली. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (BCCI AGM) राज्य संघटनांच्या प्रतिनिधींची यादी आली होती. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने संतोष मेनन यांच्या जागी रॉजर बिन्नी यांचे नाव दिले होते. रॉजर बिन्नी कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. सौरव गांगुली यांनी 23 ऑक्‍टोबर 2019 रोजी बीसीसीआय अध्‍यक्षपदाची धुरा संभाळली होती. तर 24 ऑक्‍टोबर 2019 रोजी जय शाह यांनी सचिवपदाची सूत्रे स्‍वीकारली होती. दोघांचाही कार्यकाळ ऑक्‍टोबर 2022 मध्‍ये संपणार होता.


 राजीव शुक्‍ला, जय शहा यांची फेरनिवड


बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्‍यक्षपदी माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्‍ती झाली आहे. उपाध्‍यक्षपदी राजीव शुक्‍ला तर सचिवपदी  जय शहा  तर कोषाध्‍यक्षपदी भाजप नेते आशिष शेलार यांची बिनविरोध निवड झाली. तर संयुक्‍त सचिवपदी देवाजीत सैकिया तर आयपीएल चेअरमनपदी अरुण धूमल यांची निवड झाली आहे.


कोण आहेत रॉजर बिन्नी ?


अष्टपैलू रॉजर बिन्नी यांनी 1979 ते 1987 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्यांनी 27 कसोटी सामन्‍यांमध्‍ये 830धावा केल्या आहेत. तर 72एकदिवसीय सामन्यात ६२९ धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये पाच तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक अर्धशतक झळकावले आहे. रॉजर बिन्नीने 27 कसोटीमध्ये 47विकेट्स घेतल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यात 77 विकेट्स घेतल्या आहेत. रॉजर बिन्नी यांचा 1983 च्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होते. 1983  विश्वचषक स्‍पर्धेत त्यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.