मुंबई : सीसीआयनं बीसीसीआयला ५२ कोटी २४ लाखांचा दंड ठोठावलाय. आयपीएलमध्ये नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कॉम्प्टिशन कमिशन ऑफ इंडियानं बीसीसीआयवर हा कावाईचा बडगा उगारला. २०१३ मध्येही सीसीआयनं बीसीसीआयवर अशाच प्रकारची दंडात्मक कारवाई केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीसीआयनं ४४ पानांचा अहवाल दिलाय. बीसीसीआयच्या गेल्या तीन वर्षांमधील आर्थिक उलाढालीच्या आधारे हा दंड ठोठावण्यात आलाय. आयपीएल प्रक्षेपण हक्काच्या लिलावात आर्थिक हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका सीसीआयनं ठेवलाय.


दिल्लीतील उद्योजक सुरिंदर सिंग बार्मी यांनी बीसीसीआय विरोधात भारतीय स्पर्धा आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. यावर निर्णय देताना आयोगानं बीसीसीआयनं आयपीएलच्या माध्यमातून प्रचंड नफा कमावला असं निरीक्षण नोंदवलं.