आयसीसीकडून बीसीसीआयला मिळणार तब्बल इतके पैसे...
रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलमुळे आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यामध्ये वादाचे प्रसंग निर्माण झाले होते. या मॉडेलमुळे बीसीसीआयला आता ४०.५ कोटी डॉलर (२६.१५ अब्ज रुपये) मिळणार आहेत. आयसीसीने अगोदर २९.३ कोटी डॉलर म्हणजेच १८.९२ अब्ज रुपये देण्याचे मान्य केले होते. पण एका बैठकीनंतर आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी १० करोड डॉलर्सची रक्कम वाढविण्यास सहमती दर्शवली.
दुबई : रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलमुळे आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यामध्ये वादाचे प्रसंग निर्माण झाले होते. या मॉडेलमुळे बीसीसीआयला आता ४०.५ कोटी डॉलर (२६.१५ अब्ज रुपये) मिळणार आहेत. आयसीसीने अगोदर २९.३ कोटी डॉलर म्हणजेच १८.९२ अब्ज रुपये देण्याचे मान्य केले होते. पण एका बैठकीनंतर आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी १० करोड डॉलर्सची रक्कम वाढविण्यास सहमती दर्शवली.
बीसीसीआयला आधीच निश्चित केलेल्या रकमेपेक्षा ११.२ कोटी डॉलर (७.२३ अब्ज रुपये) अधिक दिले जातील. सर्वात जास्त रेवेन्यू मिळालेल्या देशांच्या यादीमध्ये भारत प्रथम तर इंग्लंड दुसऱ्या स्थानी आहे. इंग्लडला १३.९० कोटी (८.९८ अब्ज रुपये) मिळतील.
रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल हा बीसीसीआयसाठी विवादांचा विषय राहीला. जगातील सर्वात प्रभावशाली मंडळाने ५७ कोटी डॉलर्स (३६.८१ अब्ज रुपये) देण्याची मागणी केली होती तर शशांक मनोहर यांना ती मागणी मान्य नव्हती.