Team India | चांगल्या कामगिरीनंतरही Rishabh Pant टीमबाहेर, नक्की कारण काय?
ऋषभ पंतला (Rishabh Pant) टीमबाहेर बसवण्याचं नेमकं कारण काय आहे, हा असा निर्णय तडाकफडकी का घेण्यात आला, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
मुंबई : टीम इंडियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजवर (Team India vs West Indies) 8 धावांनी थरारक विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 2-0 अशा एकतर्फी फरकाने मालिका जिंकली. टीम इंडियाचा हा 100 वा विजय ठरला. या दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंतने (Rishabh Pant) तुफानी अर्धशतक ठोकलं. त्यानंतरही पंतला टीमबाहेर बसावं लागणार आहे. विशेष म्हणजे पंतला श्रीलंका विरुद्धच्या आगामी टी 20 सीरिजमध्येही खेळता येणार नाही. पंतला टीमबाहेर बसवण्याचं नेमकं कारण काय आहे, हा असा निर्णय तडाकफडकी का घेण्यात आला, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. पंतला टीमबाहेर नक्की का ठेवण्यात आलंय, हे जाणून घेऊयात. (bcci give to break team india wicketkeepar batsman rishabh pant for 3rd t20i against west indies and upcoming t20i series against sri lanka)
नक्की विश्रांती का?
पंतला विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी आणि श्रीलंका विरुद्धच्या आगामी टी 20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे पंत हा थेट श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेतून कमबॅक करणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे. बीसीसीआयकडून याबाबत अजूनही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
पंत गेल्या काही वर्षांपासून सातत्याने टीम इंडियाचा भाग आहे. तो तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळतोय. येत्या काही काही महिन्यांमध्ये तो क्रिकेट निमित्त बिजी असणार आहे. काही दिवसांमध्ये आयपीएलही सुरु होणार आहे. त्यामुळे पंतला विश्रांती दिली आहे. दरम्यान आता पंत नसल्याने टीममध्ये त्याच्या जागी ईशान किशनला विकेटकीपिंगची जबाबदारी मिळू शकते.