कोलकाता : बीसीसीआय संस्था नॅशनल एँटी-डोपिंग एजन्सी म्हणजेच नाडा अंतर्गत यावी की नको याबाबत बीसीसीआयची आज कोलकातामध्ये तातडीची बैठक होणार आहे. बीसीसीआयची डोपिंगबाबत वैयक्तिक खाजगी एजन्सी आहे त्याचबरोबर बीसीसीआय राष्ट्रीय क्रीडा संस्था नसल्याचं कारण पुढे करत बीसीसीआय नाडाच्या अंतर्गत येण्यास नकार देत आहे. बीसीसीआय नाडा अंतगर्त यावं यासाठी वर्ल्ड एँटी-डोपिंग एजन्सी म्हणजेच वाडा आसीसीवर दबाव आणत आहे. या बैठकीला बीसीसीआयचे अधिकारी आणि तांत्रिक समितीचे अध्यक्ष सौरव गांगुली उपस्थित असतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत सरकारची एजेंसी नॅशनल अँटी डोपिंग एजेन्सी (नाडा) ने अनेकदा खेळाडूंच्या डोपिंग टेस्टसाठी बीसीसीआयला सूचना केल्या. पण बीसीसीआयने यावर कोणतंही ठोस पाऊल उचललं नाही. पण आता सदस्य देश आणि वाडाच्या दबावामुळे बीसीसीआयला नाडाच्या अंतर्गत यावं लागणार आहे.


बीसीसीआयचा वाडा आणि नाडा या दोघांशी कोणताही करार नाही. त्यांनी आयसीसीसोबत करारावर सही केली आहे. आयसीसी वाडाच्या नियमांचं पालन करतो. बीसीसीआयचा कोणताही मजबूत अधिकारी सध्या आयसीसीमध्ये नाही. त्यामुळे बीसीसीआयला नियमांचं पालन करावं लागेल. आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर हे जरी बीसीसीआयचे अधिकारी असले तरी ते नियमांच्या विरोधात न जाणारे व्यक्ती आहेत.