मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने प्रतिष्ठेच्या पद्म भूषण पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीने भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान लक्षात घेऊन त्याच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ साली टी-२० वर्ल्डकप, २०११ मध्ये ५० षटकांचा क्रिकेट वर्ल्डकप जिंकला. त्याच्या या कार्याची दखल घेतली.


यावर्षीच्या पद्म पुरस्कारासाठी फक्त एमएस धोनीच्या नावाची शिफारस केल्याचे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  सध्याच्या घडीला धोनीपेक्षा दुसरा कोणी योग्य व्यक्ती नसल्याने त्याच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे, असे बीसीसीआय पदाधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले.