मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि रनमशीन म्हणून विराट कोहलीची ओळख आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून गेल्या दीड वर्षात धावा निघत नाहीत. विराटच्या चाहत्यांसाठी ही फार चिंतेची बाब आहे. मात्र त्याचसोबत आता बीसीसीआयने देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने कोहलीचा सध्याचा फॉर्म हा चिंतेचा विषय असल्याचं म्हटलंय. या अधिकाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे, विराट कोहलीने क्रिकेट विराटचा सध्याचा फॉर्म हा चिंतेचा विषय असून बीसीसीआय आणि सिलेक्टर्ससाठीही हा मोठा विषय बनला आहे. 


दुसरीकडे कोहली जूनमध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 सीरिजमध्ये खेळणार नसल्याची माहिती मिळतेय. विराट कोहली 5 टी 20 सामन्यांच्या सीरिजसाठी टीम इंडियातून बाहेर जाण्याची शक्यता आहे. हे सामने 9 ते 19 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहेत. या सीरिजसाठी कोहलीला आराम दिला जाण्याची शक्यता आहे.


इनसाईड स्पोर्ट्सला माहिती देताना सिलेक्शन कमिटीच्या एका सदस्याने म्हटलं की, ही काही पहिली वेळ नाही की, एखादा खेळाडू असा काळातून जातोय. तसंही या सिरीजसाठी तरूण खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे, जेणेकरून अनुभवी खेळाडूंना आराम देता येईल. विराटलाही आराम देण्यात येईल, मात्र त्याला खेळायंच असेल तर आम्ही विचार करू. सिलेक्टर्स बैठकीपूर्वी त्याच्याशी बोलून घेणार आहेत.


या सीरिजमध्ये फक्त विराट कोहलीच नाही तर रोहित शर्मा, जसप्रीत बुमराहसह इतर काही वरिष्ठ खेळाडूंनाही आराम दिला जाण्याची शक्यता आहे.