मुंबई : बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली विराट कोहलीसोबतच्या वादानंतर बरेच चर्चेत राहिले. BCCI अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गांगुली यांना अनेक टीकांचा सामना करावा लागलाय. दरम्यान आता गांगुली पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता गांगुली यांनी नवा कसोटी कर्णधार कसा असला पाहिजे हे सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुली यांना विचारण्यात आलं की, विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारच्या नवीन कसोटी कर्णधाराची वाट पाहत आहात? 


यावर देताना सौरव गांगुली म्हणाला, "कर्णधारपदासाठी काही निकष आहेत. जो या निकषांमध्ये बसेल तोच पुढील भारतीय कसोटी कर्णधार असेल." 


दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर झालेल्या पराभवानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडलं. आता बीसीसीआय लवकरच भारताच्या नवीन कसोटी कर्णधाराची घोषणा करणार आहे. तर टी-20 आणि वनडेसाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्येही कर्णधारपदाची भूमिका निभावणार आहे. 


दरम्यान केएल राहुल, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर यांची कर्णधारपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.


भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका होणार आहे. 25 फेब्रुवारीपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या दोन टीम्समध्ये दोन सामने होणार आहेत. वेळापत्रकानुसार, पहिली कसोटी 25 फेब्रुवारी ते 1 मार्च यामध्ये बंगळुरूत खेळवली जाईल. तर दुसरी कसोटी 5 मार्च ते 9 मार्चदरम्यान मोहालीमध्ये होणार आहे.