BCCI अध्यक्ष Sourav Ganguly ने खरेदी केलं विराटपेक्षा महागड घर
बीसीसीआय (Bcci) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी आलिशान घर घेतलंय.
कोलकाता : बीसीसीआय (Bcci) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी आलिशान घर घेतलंय. या घराची किंमत काही कोटींच्या घरात आहे. गांगुलीच्या या घराची किंमत ही विराट कोहलीच्या घरापेक्षा या अधिक आहे. विराटच्या घराची किंमत ही 30 कोटी आहे आलिशान विशेष म्हणजे गांगुलीने घेतलेलं हे घर उच्चभ्रू परिसरात घेतलंय. (bcci prsident and former team india captain sourav ganguly buy new house)
या घराची किंमत 40 कोटी इतकी आहे. या घरात राहण्यासाठी गांगुलीला वडिलोपार्जित घर सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. या वडिलोपार्जित घराची किंमत त्यावेळेस सर्वात जास्त होती. मात्र आता गांगुलीने हे घर सोडत नवा घरात प्रवेश केला आहे.
गांगुली भावूक
प्रत्येकाच्या आपल्या घरासोबत अनेक आठवणी असतात. मात्र आपलं राहतं घर सोडून नव्या घरात जाताना अनेकांना दाटून येतं. त्या घरात घालवलेले चांगले-वाईट क्षण आठवतात.
जितकी उत्सुकता नव्या घराबाबत असते, तितकंच वाईट हे जुनं घर सोडावं लागणार असल्याच्या जाणिवेतून होतं. गांगुलीला अशाच काही स्थितीचा सामना करावा लागला.
जुनं घर सोडताना गांगुली भावूक झाला. "मी नवं घर घेत्याने फार आनंदी आहे. शहराच्या मध्यभागी राहणं हे फार आरामदायक आहे. तसेच मी ज्या घरात 48 वर्ष राहिलो, ते घरं सोडणं माझ्यासाठी फार अवघड होतं", अशी प्रतिक्रिया गांगुलीने 'द ट्रेलिग्राफ'सोबत बोलताना दिली.