Rohit Sharma And Virat Kohli: इंग्लंड दौरा सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामुळे बीसीसीआय चांगलीच संतापली असून या दोघांवर लवकरच कारवाई होऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 जुलै ते 17 जुलै दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात एक कसोटी, 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहली लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसले आहेत. यादरम्यान त्यांनी मास्क न लावता चाहत्यांसोबत क्लिक केलेला फोटोही पाहायला मिळाला. आता रोहित आणि विराटच्या या कृतीमुळे बीसीसीआय प्रचंड संतापले आहे.


संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या या कृतीमुळे बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी इनसाइडस्पोर्ट्सला सांगितले की, 'इंग्लंडमध्ये कोरोनाचा धोका कमी असला तरी खेळाडूंनी अधिक काळजी घेतली पाहिजे. आम्ही संघाला थोडे सावध राहण्यास सांगू. रोहित आणि विराटने मास्क न घालता शॉपिंग केल्याची माहिती समोर आली आहे.'



गेल्या वर्षी कोरोनामुळे रद्द झालेल्या पाचव्या कसोटीची भरपाई करण्यासाठी एकमेव कसोटी खेळली जाईल. अशा परिस्थितीत बीसीसीआय खेळाडूंना अजिबात सूट देऊ इच्छित नाही. ब्रिटनमध्ये दररोज कोविड-19 चे 10  हजारांहून अधिक प्रकरणे समोर येत आहेत.