IND vs AUS: KL Rahul च्या उपकर्णधारपदाबाबत BCCI ने घेतला मोठा निर्णय, आता सुट्टी नाही...
KL Rahul,BCCI,Vice Captain: संघाची यादी जाहीर करताना बीसीसीआयनं केएल राहुलचं (KL Rahul) नाव उपकर्णधार म्हणून ठेवलं होतं, तर यावेळच्या संघाच्या यादीत कोणत्याही खेळाडूविरुद्ध उपकर्णधार (Vice Captain) लिहिलेलं नाही.
India Squad Announced: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि उर्वरित दोन टेस्टसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात (India Squad Announced vs odi series australia) आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये (IND vs AUS) तीन वनडे सामने खेळवले जाणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या मालिकेतील पहिला सामना खेळणार नाही. जागी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टीमचं नेतृत्व करणार आहे. अशातच आता बीसीसीआयने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे.
KL Rahul चं उपकर्णधारपद गेलं?
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मागच्या वेळी संघाची यादी जाहीर करताना बीसीसीआयनं केएल राहुलचं (KL Rahul) नाव उपकर्णधार म्हणून ठेवलं होतं, तर यावेळच्या संघाच्या यादीत कोणत्याही खेळाडूविरुद्ध उपकर्णधार (Vice Captain) लिहिलेलं नाही. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
IND vs AUS: टेस्ट सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा - (India’s Test squad for third and fourth Test)
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
IND vs AUS: वनडे सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा (India’s ODI squad against Australia)
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन (WK), हार्दिक पांड्या (VC), आर जडेजा, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, युजवेन्द्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज , उमरान मलिक, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, जयदेव उनादकट